नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू
Manifesto Approval of new fair price shops
सातारा, यवतमाळ जिल्ह्यात अर्ज मागविले.
सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे. या दुकानांसाठी इच्छुकांनी 30 जुलैपर्यंत अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
यामध्ये सातारा तालुका गावे ८ व शहरी ठिकाणे ०३, वाई तालुका - गावे-१५, कराड तालुका गावे- ६, महाबळेश्वर तालुका-४४, कोरेगाव तालुका -१३, खटाव तालुका-१०, फलटण तालुका ४, पाटण तालुका-१९, माण तालुका- ४, खंडाळा तालुका-७, जावली तालुका- ८ अशा एकूण १४१ गावे ठिकाणांचा समावेश आहे.
तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करावयाचे आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या 321 गावांच्या ठिकाणी रास्तभाव दुकानांचे प्राधिकारपत्र मंजूर करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणांसाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रास्तभाव दुकान परवानासाठी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालय येथे प्राप्त होऊन स्विकृत केले जातील. दुकानाचे अर्ज १०० रुपये चलानाद्वारे लेखाशीर्ष ४४०८ द्वारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल. अर्ज विक्री व स्वीकृत करण्याची अंतीम मुदत दि.३१ जुलै पर्यंत आहे.
महागांव तालुक्यात कलगाव, बोढारा, - 02
पुसद तालुक्यात पाळोदी, पोखरी, लोभिवंतनगर, मारवाडी खु, चोंढी, पारवा खु, येहळा, गहुली, अमृतनगर, जामनाईक-२, शिवाजीनगर, ब्राम्हणगाव, मरसूळ, रंभा, पिंपळगाव पा, कवडीपूर, देवगव्हान, धुंदी, असरपेंढ, हुडी, हर्षी, हनुमाननगर, नानंद इजारा, लोहारा खु, अनसिंग, गौळमांजरी, शेंबाळ पिंपरी, शेंबाळ पिंपरी, बाळवाडी, पिंपरवाडी, धनकेश्वर येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे. - 31
वणी तालुक्यात रांगणा, झोला, बोर्डा, कोलेरा, वडजापूर, महाकालपूर, येनक, साखरा को, वणी-४, कायर, बाबापूर, पठारपूर, झरपट, वागदरा, गोवारी नि, नायगाव खु, धोपटाळा, जुनाडा, बोरगाव जु, लाठी, निवली, शेलू बु, कुंड्रा, हिवरधरा, चिंचोली, शेवाळा, विठ्ठलनगर, मारेगाव को, कोरंबी, कुंभारखणी, गोडगाव, मेंढोली, नवरगाव, पिल्कीवाढोणा, केशव नगर, माथोली, जुगात, चनाखा, पाथरी, धुनकी, मूर्ती, देऊरवाडा, आमलोन, गाडेघाट, सैदाबाद, शीरगिरी, वणी-२६, दहेगाव डो, डोंगरगाव, आबई, वडगाव टीप, कुरई, विरकुंड, मजरा, पुरड (पु) येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे. - 55
घाटंजी तालुक्यात कोंडजई, कोपरा वन, सायफळ, मांडावा, राजेगाव, चिंचोली, लिंगी, चांदापूर, टिपेश्वर, अंजी नृ, मोवाडा लहान, हेटीतांडा, मारेगाव, रहाटी, वाघार टाकळी, लिंगापुर, राजापेठ, सगदा. - 20
केळापुर तालुक्यात मिरा, वाढोणा बु, शामपूर, मोरवा, अंधारवाडी, सुन्ना, बल्लारपूर, हिवरी, पिंपळशेंडा, पिटापोंगरी, चोपन, निलजई, लिंगटी (भा), बेलोरी, गणेशपूर सिंचन, तातापूर, वेडद, सुसरी, पेंढरी, वडवाट, कारेगाव (बं), पांढरकवडा, झुंझापूर, नागेझरी, महाडोळी, खैरी, साखरा (बु), केगाव, बग्गी, पिंपळखुटी. - 30
झरी जामणी तालुक्यात येडसी, चिखलडोह, बाळापुर, बोपापूर, येवती, हिवरा, रामपूर, पालगाव, अम्बेझरी, बोटोनी येथे दूकान मंजूर करावयाचे आहे. - 10
बाभुळगांव तालुक्यात उमर्डा, उमरी, डेहणी, पालोती, मांगुल, प्रतापपूर, बारड, विरखेड, लोणी, इंदिरानगर, कोपरा-१, वैजापूर, पहूर-१६, भटमार्ग, चीमणापूर, पानस, आलेगाव, राऊत सावंगी, कोतंबा, कृष्णापूर, चेंडकापूर, - 21
उमरखेड तालुक्यात कुपटी, दहागाव, एकंबा, परजना, उंचवडद, दराटी, थेरडी, उमरखेड, टेंभूरदरा, खरूस खु, घडोली, टाकळी बं. येथे दुकान मंजूर करावयाचे आहे. - 12
दारव्हा तालुक्यात वघळ, तरनोळी, लाडखेड, सावळा. - 04
राळेगांव तालुक्यात चोंदी, एकलारा, रामतीर्थ, दापोरी कासार, वरध-२, वालधुर, तेजनी, सावरखेडा, रिधोरा, वाटखेड, करंजी सोनाबाई, गोपालनगर, श्रीरामपूर, सावनेर, धूमकचाचोरा, एकुर्ली, उमरेड, चिंचोली, चिखली वि, दापोरी कलाल, इंझापूर, वाहा, कोपरी, उमरविहीर, रानवड, सावित्री (पोंपरी), कारेगाव (नंदुरकर), चिखली (व), झोटिंगधरा, शेळी, इचोरा, आष्टा, बोरी, संगम, कळमनेर, बरडगाव, मांडवा, रोहिणी, एकबुजी, नगाई, बोराटी, खेमकुंड, पार्डी, लाडकी येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजुर करावयाचे आहे. 43
यवतमाळ तालुक्यात पिंप्री पांढुर्णा, पिंप्री इजारा, वाटखेड, येवती, यवतमाळ, वाकी, यवतमाळ सिंघानिया नगर, धरमगाव, जांभूळणी, टाकळी, मूरझडी, दुधाना, सुकळी, वरुड, यवतमाळ, एकांक संख्येनुसार अतिरिक्त दुकान वाघापूर, जुना वडगाव, पिंपळगाव, माळीपुरा लोखंडी पूल. - 19
दिग्रस तालुक्यात पेळू, मरसूळ, दिग्रस, शिवणी, वरंदळी, चिंचोली क्र १. -06
मारेगांव तालुक्यात पांडविहीर, बोटोणी-१, कान्हाळगाव, वसंतनगर, सावंगी, चिंचमंडळ, मुकटा, बोदाड, हिवरा मजरा, डोंगरगाव, पिसगाव, पाथरी, महागाव, साखरा, टाकळी, कुंभा-२, शिवनाळा, खेकडवाई, खैरगाव बुट्टी, जळका, मेंढनी, आपटी, लाखापूर, वरुड येथे दुकान मंजूर करावयाचे आहे. - 24
येथे रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करावयाचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.
दुकान निवडी साठी प्राधान्यक्रम
३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, ४. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास
अर्ज करताना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
२. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.
४. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, ७/२, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुटमध्ये.
८. पंचायत / स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती. ९. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.
Old Update
यासाठी नंदुरबार जील्ह्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रिक्त ठिकाणांसाठी अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये रु.१०/- शासनजमा करुन घेऊन उपलब्ध होतील. सदरचे अर्ज दिनांक 03.07.2023 ते दिनांक 03.08.2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये स्विकारण्यात येतील.
उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार इच्छूक पंचायत/संस्था/गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत.
वाशिम जिल्हयात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने परवाना मंजूरीकरीता संबंधित गावात जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील 28 गावात रिक्त असलेल्या ठिकाणी रास्त भाव दुकाने सुरु करण्याकरीता 20 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत इच्छुकांकडून संबंधित तहसिल कार्यालयामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने तालुका व गाव/ वार्डनिहाय पुढील प्रमाणे. वाशिम तालुका- काटा भाग-2, कानडी, कामठवाडा, घोटा, धारकाटा व कुंभारखेडा.
मालेगांव तालुका- मालेगाव शहर (गांधीनगर), पांगरखेड, वरदरी (खु.), कुरळा व झोडगा (खु.). रिसोड तालुका- कोयाळी खु. (केनवड) व तपोवन.
मंगरुळपीर तालुका- एकांबा व स्वाशिन,
कारंजा तालुका- कारंजा वार्ड क्र. 21, कारंजा वार्ड क्र. 4, वढवी, वडगांव (रंगे), पिंपळगांव (खु). व धोत्रा जहाँगीर.
मानोरा तालुका- जामदरा घोटी, पाळोदी भाग- 1, आसोला (खु.), बोरव्हा, चाकुर, वार्डा व जवळा (खु.) अशा एकूण 28 गावात व वार्डात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
28 नवीन रास्त भाव दुकान परवाने हे खालील प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहे. यामध्ये पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयं सहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांनी दिली.