तूर व उडीद साठयावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध | tur stock limit

तूर व उडीद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

tur stock limit

डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणात दरवाढ होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारात केंद्र शासनाच्या दि. २ जून २०२३ च्या अधिसूचनेन्वये डाळींच्या साठ्यावर (तूर व उडीद) घाऊक, किरकोळ व्यापारी, मिलर्स व इम्पोर्टर्स यांच्यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त साठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.  

साठेबाजी  करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध पुरवठा यंत्रणेकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर डाळींचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे.  तूर व उडीद डाळींचा साठा निर्बंध खालीलप्रमाणे –

घाऊक व्यापारी :- प्रत्येक डाळीसाठी २०० मेट्रीक टन

किरकोळ व्यापारी :- प्रत्येक डाळीसाठी ५ मेट्रीक टन

बिग चेन रिटेलर्स :-  प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी ५ मेट्रीक टन व डेपोसाठी २०० मेट्रीक टन मिलर्स

गत तीन महिन्यांतील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू होईल.

इम्पोटर्स :- सीमा-शुल्क मंजूरीच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करून ठेवता येणार नाही. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

शासन नियुक्त संस्थांकडून प्रमुख शहरांमधील होलसेल / किरकोळ 23 जून 2023 चे दर पुढीलप्रमाणे :

जिल्हातूरडाळमूगडाळउदीड डाळहरभरा डाळमसूर डाळ
घाऊककिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दर
मुंबई105147105141105142649978107
नागपूर13515011011810511562727583
पुणे1201449811810010964697477
नाशिक1281459711410011761757287
लातूर13214310912111312663719091
औरंगाबाद (खुल्ताबाद)111117961179810361658998