मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू | Cycle anudan yojana 2023

मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू 

Cycle anudan yojana 2023


जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय शालेय मुलामुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविणे ही योजना घेण्यात येत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जदारांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 

या योजनेंतर्गत जे विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी आहेत व इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.

त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्यांच्या घरापासून किमान दोन कि.मी. असावे. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड केलेल्या लाभार्थीने सर्वप्रथम सायकल खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांना सादर करावयाचा आहे. 

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सायकलच्या किंमती इतकी अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये वर्ग करण्यात येईल.  

जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त तालुक्यातील पात्र लाभार्थीचे अर्ज आपल्या स्तरावर मागविण्यात यावेत. या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थींचे अर्ज आपल्या शिफारशीसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. 

छाननी अंती अपात्र झालेल्या अर्जातील कागदपत्राची पूर्तता करुनच परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. अपात्र अर्जाच्या कारणासह संबंधित अर्जदारास अवगत करुन प्रकरण निकाली काढावेत. 

छाननी अंती पात्र लाभार्थीचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 30 जुलै, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण आधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे. 

निवडीचे निकष : विहित नमुन्यातील लाभार्थ्यांचा अलीकडे काढलेला पासपोर्ट फोटोसह अर्ज करणे आवश्यक आहे. 

लाभार्थी हा मागासवर्गीय (अनु.जाती, अनु.जमाती, विजाभज, विमाप्र) प्रवर्गातील असावा. यासाठी मुख्याध्यापक, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी हा हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. 

यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांचे रहिवाशी प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र व आधारकार्ड इत्यादी आवश्यक आहे. कुटुंबातील फक्त एकाच विद्यार्थ्यास लाभ देण्यात येईल. यापूर्वी लाभार्थीने इतर कोणत्याही योजनेतून अनुदानावर सायकल खरेदी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी हा इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिक्षण घेत असावा. 

यासाठी पुराव्यादाखल शाळेतील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्राप्त अर्जामधून पात्र लाभार्थींची अंतिम निवड करण्यात येईल. 

लाभार्थी निवडीची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासन अथवा जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमार्फत करण्यात येईल. विद्यार्थी हा शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्याचा पाल्य नसावा. पुराव्यादाखल स्वयंघोषणापत्र जोडावे. या योजनेंतर्गत अनुदान मर्यादा जास्तीत जास्त 5 हजार रुपये राहील.

Cycle arj namuna 

Click here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map