खताला सबसिडी जाहीर, असे असतील नवे दर | fertilizer prices 2023

 खताला सबसिडी जाहीर, असे असतील नवे दर 

 fertilizer prices 2023


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) नत्र (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि गंधक (S) या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आणि खरीप हंगाम2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.



फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान हे 01-04-2010 पासून पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते.  शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश  खतांसाठी युरिया 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने  रब्बी हंगाम2022-23 साठी 01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी पोषण आधारित अनुदान  (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली असून खरीप  हंगाम2023 साठी 1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते अनुदानित दरात देण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकार खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानितपरवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत डीएपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण देखील शक्य होईल.


फायदे:

डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि त्याच्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीचा भार प्रामुख्याने केंद्र सरकारने उचलला आहे. डाय-अमोनियम फॉस्फेटवरील सध्याच्या 1650 रुपये प्रति बॅग अनुदानाऐवजी 2501 रुपये प्रति बॅग अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे जे गेल्या वर्षीच्या अनुदान दरांपेक्षा 50% वाढले आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट आणि त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ अंदाजे 80% आहे. हे शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरांवर अधिसूचित फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते मिळण्यास मदत करेल आणि कृषी क्षेत्राला मदत करेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खरीप हंगाम - 2022 करिता (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

आर्थिक परिणाम:

एनबीएस खरीप-2022 साठी (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अनुदान. 60,939.23 कोटी रुपये असून त्यात मालवाहतूक अनुदानाद्वारे स्वदेशी खतासाठी (SSP) समर्थन आणि स्वदेशी उत्पादन आणि डाय-अमोनियम फॉस्फेटच्या आयातीसाठी अतिरिक्त समर्थन यांचा समावेश आहे.