तुरीच्या आयाती बाबत शासनाचा मोठा निर्णय, तूर भावाच काय होणार ? | tur dal import duty update

तुरीच्या आयाती बाबत शासनाचा मोठा निर्णय, तूर भावाच काय होणार ?

tur dal import duty update

तूर डाळीच्या साठ्यासंदर्भात देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केली समिती

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानेआयातदारगिरणीमालकसाठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त सचिवनिधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. तूर डाळीची नियमित  स्वरूपात चांगल्या प्रमाणात आवक होत असून देखील बाजारपेठेशी संबंधित हा साठा खुला करत नसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या घोषणेमागे  साठेबाज आणि बाजारातील सट्टेबाज यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट होतो. त्याचबरोबर आगामी काळात तूर डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार देखील यातून व्यक्त होत आहे. याशिवाय येणाऱ्या महिन्यांमध्ये इतर डाळींच्या  किंमतीमध्ये अवास्तव वाढ होऊ नये याउद्देशाने  देशांतर्गत बाजारपेठेत इतर डाळींच्या  साठ्यावर देखील केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये,  तूर डाळीचा साठा जाहीर करण्यासंदर्भात काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या  सूचनासर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना12 ऑगस्ट 2022 रोजी जारी केल्या आहेत. तसेच सुरळीत आणि सुविहित  आयातीसाठीसरकारने कमी विकसित देश  वगळता इतर देशांमधून होणाऱ्या तूर आयातीवर लागू होणारा 10 टक्के कर रद्द केला आहे.

कारण या शुल्कामुळे कमी विकसित देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या  शून्य शुल्क आयातीमध्ये देखील प्रक्रियात्मक अडथळे निर्माण होत होते.

होळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

tur dal import duty update


तूरीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे. 

आतापर्यंत सरकारने तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.

संपूर्ण तूर डाळीवरील शुल्क हटवण्याचा आदेश अर्थ मंत्रालयाने 3 मार्च रोजी जारी केला आहे. हा आदेश 4 मार्चपासून लागू होणार आहे.

डाळीवरील 11 टक्के आयात शुल्क हटवल्यानंतर डाळींच्या किमती कमी होणार आहेत. केंद्र सरकारने सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र याचे परिणम तुरीच्या बाजार भावा वर होण्याची दाट शक्यता आहे,

पहा काय परिणाम होतील खालील लिंक वर 

👇