हरभरा खरेदी साठी नाफेडची हमी भाव खरेदी केंद्र मंगळवारपासून सुरु | Nafed chana kharedi

हरभरा खरेदीसाठी नाफेडची हमी भाव खरेदी केंद्र मंगळवारपासून सुरु


Nafed chana kharedi 2023



केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत नाफेडच्या वतीने रब्बी हंगामातील हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. 14) आठ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. 

त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे. 


जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना खरेदी केंद्राच्या ठिकाणी २७ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. 

  • परभणी येथील माणिक निलवर्ण (9960093796) यांच्या परभणी तालुका खरेदी विक्री संघ, एमआयडीसी परिसर, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर परभणी, 

  • जिंतूर येथील नंदकुमार महाजन (9405473999) यांच्या जिंतूर तालुका जिनींग प्रेसींग सह. सोसायटी मर्यादित, जिंतूर, 

  • पुर्णा येथील संदीप घाटोळ (9359333413) यांच्या पुर्णा तालुका सह. खरेदी विक्री संघ, मोंढा पुर्णा, 
  • पाथरी येथील अनंत गोलाईत (9960570042)यांच्या स्वतीक सुशिक्षित बेरोजगार सेवासह. संस्था परभणी, मार्केट यार्ड पाथरी, 
  • सोनपेठ येथील श्रीनिवास राठेाड (9096699697) यांच्या स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था परभणी सोनाहारी वेअरहाऊस शेळगाव रोड, सोनपेठ, 

  • बोरी येथील संतोष गलांडे यांच्या (9370441035) तुळजाभवानी कृषि विकास सेवा सह. संस्था मर्या. बोरी बोर्डीकर कॉम्प्लेक्स, 

  • सेलू येथील विठ्ठल शिंदे (9860986854) यांच्या तुळजाभवानी कृषि विकास सेवा सह. संस्था मर्या. बोरी, मार्केट यार्ड सेलू, 

  • मानवत येथील माणिक भिसे (9860654159) यांच्या मानवत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मानवत मार्केट यार्ड मानवत येथे ही खरेदी केंद्र सुरु राहणार आहेत. 

ही खरेदी केंद्र मंगळवारी सुरु होत असून, ११ जूनपर्यंत या खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी केला जाणार असल्याचे जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 


नोंदणीसाठी ही कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक

तरी शेतकरी बांधवांनी त्यांच्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी नोंदणीसाठी रब्बी हंगाम 2022-23 मधील पीकपेरा नोंद असलेला ऑनलाईन 7/12, आधार कार्ड झेरॉक्स,  बँक पासबुक झेरॉक्स सोबत ठेवावे. बँक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. (खातेधारक शेतकऱ्याने जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). 

संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री. शेवाळे यांनी केले आहे.