अंगणवाडी भरती हायकोर्ट निकाल, रिक्त जागा | Anganvadi bharti 2023

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ

रिक्त जागा भरती, हायकोर्ट निकालानंतरच

Anganwadi sevika mandhan 2023

Anganvadi bharti 2023

राज्यात अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पोषण ट्रॅकर ॲप व मोबाईल बाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आदेश दिला.

'पोषण ट्रॅकर'ॲपमध्ये मराठीत माहिती टाईप करण्याची सुविधा व नवीन चांगला मोबाईल उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने १३ एप्रिल रोजी उत्तर द्यावे तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये व लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये' असा स्पष्ट आदेश दिला.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरच्या खाजगी मोबाईलवरून शासकीय काम करायला लावल्याने अंगणवाडी कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात काम करत होते.

अंगणवाडी सेविकांना ८ हजार ३२५ रुपये मानधन होते. ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे १० हजार रुपये झाले आहे. 

मिनी अंगणवाडी सेविकांना ५ हजार ९७५ रुपयावरून ७ हजार २०० रुपये, 

मदतनिसांना ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रुपये मानधन झाले आहे. 

तसेच अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांची २० हजार पदे भरती केली जाणार आहे.

परभणी जिल्ह्यात परभणी प्रकल्पांतर्गत २८६, सेलू १५०, जिंतूर २९८, गंगाखेड, १९६, पुर्णा १८३, पालम १५०, पाथरी ११८, मानवत १०० व सोनपेठ ९५ असे एकूण १ हजार ५७६ अंगणवाडी केंद्र आहेत. 

यात अंगणवाडी सेविकांची १ हजार ५७६ पदे मंजूर असून १ हजार ५०१ पदे भरली तर केवळ ७५ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांची १३६ पदे मंजूर असून १३० पदे भरली तर ६ पदे रिक्त आहेत. तसेच मदतनीसांची १ हजार ५७६ पदे मंजूर असून १ हजार ४३८ पदे भरली असून १३८ पदे रिक्त आहेत. 

परभणी जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस असे एकूण ३ हजार २८८ पदे मंजूर असून ३ हजार ६९ पदे भरली तर २१९ पदे रिक्त आहेत.

a

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली प्रकल्पांतर्गत १८९, वसमत २२५, कळमनुरी १०७, आखाडा बाळापूर १४५ औंढा नागनाथ २०४ व सेनगाव २२५ असे एकूण ०१ हजार ९५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकाची ९६३ पदे मंजूर असून ९२२ पदे भरलेली आहेत. तर ४१ पदे रिक्त आहेत.

मिनी अंगणवाडी सेविकांची १३२ पदे मंजूर असून १३० पदे भरलेली आहेत, तर ०२ पदे रिक्त आहेत. तसेच मदतनीसांची ९६३ पदे मंजूर असून ८२५ पदे भरलेली असून १२५ पदे रिक्त आहेत. 

जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस असे एकूण २०५८ पदे मंजूर असून १ हजार ८७७ पदे भरलेली आहे.  तर १८१ पदे रिक्त आहेत.