खरीप पीक विमासाठी निधी आला || kharip Pik vima yojana 2022

खरीप पीक विमा  करीता निधी वितरित

 kharip Pik vima


राज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विम्याच संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) राबवली जाते, याच योजनेच्या अंतर्गत खरीप हंगाम २०२२ kharip pik vima 22 संदर्भातील एक महत्वपूर्ण शासन निर्णय government GR आलेला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022 23 शासन निर्णय दिनांक 1. 7. 2022 अन्वये भारतीय कृषी विमा कंपनी आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी ergo जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या 5 विमा  कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनास हिस्सा अनुदानाची मागणी केली आहे.

GR LINK 👇

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य हिस्सा विमा हप्ता रु. 78,11,844/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 244,86,25,869/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202303021154238301.pdf


प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. ७२४,५१,४६,८०९/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.



केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्र.13.1.6  नुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्रा व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा हा ग्रीन स्वरूपात पहिला हप्ता कंपनीत अदा करणे आवश्यक आहे.

 सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेले एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या 80 टक्क्यांच्या 50 टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात कंपन्यांना द्यावी असे नमूद आहे त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने  पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून 842,17,84,541/  इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यास अदा करण्यात आली आहे.

शासन निर्णय येथे पाहा.

GR link

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. 842,17,84,541/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.