फक्त याच प्रवासासाठी महिलांना सवलत | Mahila sanman yojana 2023

अर्थसंकल्प २०२३  Budget 2023

राज्याच्या सन २०२३ २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना राज्य परिवहन महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महोदयांनी महाराष्ट्र महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के प्रवास सवलत.

"महिला सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासातील तिकीट दरात ५० टक्के प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

“महिला सन्मान योजना" अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या (साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) इत्यादी) बस प्रवासातील तिकीट दरात ५०% सवलत दि. १७.०३.२०२३ पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे.

सदरची सवलत महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय राहील.

सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय राहणार नाही