युरिया DAP खतांबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय |Buffer stock of UREA & DAP in Maharashtra

युरिया DAP खतांबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय 

Buffer stock of UREA & DAP in Maharashtra 

Urea Buffer stock


शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात सुरळीत खात  ( fertilizer ) पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकार करणार खताचा मोठा साठा ( Buffer Stock ) 

सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन वादाच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात खताचा मोठ्या प्रमाणात तुटवढा जाणवू शकतो, खताचे भाव  ( Fertilizer prices in Maharashtra ) वाढू शकतात या चिंतेने शेतकरी चिंतातुर असताना हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यामध्ये खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये  शेतकऱयांकडून खताची मागणी, खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठया प्रमाणावर होत असतो. या कालावधीमध्ये  निरनिराळ्या  कारणामुळे म्हणजेच

  • मुळातच खतांचे आवंटन कमी असणे, 
  • पाऊस किव्हा अतिवृष्टी मुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा येणे,
  • रेल्वे रेक वेळेवर उपलब्ध न होणे, 
  • खत उत्पादन  कारखाने कार्यान्वित नसणे 

इत्यादीमुळे खताच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम होतो. खरीप हंगाम जून महिन्यापासून सुरु होत आहे. खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी व उभ्या पिकांना  खताचा दुसरा हप्ता देणे यामुळे युरिया व डी ए पी  खतांच्या मागणीमध्ये वाढ होत असते. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलध्दता होण्यासाठी खरीप हंगाम 2022 करीता युरिया व डी ए पी खताचा व रब्बी हंगाम 2022-23 करीता युरीया खताचा सरंक्षित साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. 

माहे एप्रिल  २०२२ पासून युरीया व रडएपी खतांचा साठा करण्यास सुरुवात केल्यास, त्याचा उपयोग जून महिन्यानंतर होऊ शकतो याच पार्शवभूमीवर मंत्रिमंडळ  उपसमितीच्या 15 फे ब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यात खरीप 2022 मध्ये 1.00 लाख मे.टन युररया खत व 0.50 लाख मे.टन रडएपी खताचा संररित साठा करण्याबाबत, तसेच, रब्बी 2022-23 मध्ये 0.50 लाख मे. टन इतका युररया खताचा संररित साठा (Buffer Stock) करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

याच संदर्भातील एक शासन निर्णय आज ३० मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे 

शासन निर्णय आपण खालील लिंक वर पाहू शकता. 

प्रशासकीय मान्यता- खरीप व रब्बी हंगाम सन 202२-2023 करीता युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवणेबाबत.


खरीप हंगाम 202२ मध्ये राज्यातील शेतकऱयांना मागणीप्रमाणे व वेळेवर UREA & DAP  खतांचा पुरवठा करण्यासाठी 1.00 लाख मे.टन युररया खत व 0.50 लाख मे.टन रडएपी खताचा संररित साठा करण्याबाबत, तसेच, रब्बी 2022-23 मध्ये 0.50 लाख मे. टन युररया खताचा संररित साठा (Buffer Stock) करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

यासाठी  महाराष्ट्र कृषी  उद्योग विकास  महामंडळ, गोरेगाव, मुंबई, 2) विदर्भ  को-ऑपरेरटव्ह मार्केटिंग फेडरेशन  3)  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेरटव्ह माके कटग फे डरेशन लिमिटेड  मुंबई या तीन सं्थांना शासनाचे “नोडल एजन्सी” म्हणून रनयुक्ती करण्यास तसेच महाराष्ट्र कृ रि उद्योग रवकास महामंडळास 70 टक्के व इतर दोन सं्थांना प्रत्सयेकी 15 टक्के या प्रमाणे संररित साठा करण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. 

या निर्नायमुळे येणाऱ्या काळात शेतकर्याना मोठा दिलासा मिळणार आहे.