राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक २१ जुलै २०२६ निर्णय संक्षिप्त कृषी विभाग - नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे होणार शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय. महाविद्यालयात दरवर्षी १२० जागांवर होतील प्रवेश. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांना होणार लाभ. फळे, भाजीपाला, फुले तसेच प्रक्रीया व मुल्यवर्धनासाठी अभ्यास, संशोधनास चालना. महाविद्यालयासाठी ५१ नियमित पदांनाही मान्यता. नागपूर व अमरावती विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, आंबा, लिंबू, पेरू इत्यादी व मुख्य फळ पिकाव्यतिरिक्त कमी पाण्यावर तग धरणारी आवळा, सिताफळ या फळपिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील फळे, भाजीपाला व फुलशेतीची विविधता बघता उद्यानविद्या महाविद्यालयाची आवश्यकता आहे. या महाविद्यालयामध्ये फळे, भाजीपाला, फुले तसेच, प्रक्रिया व मूल्यवर्धन या संबंधीच्या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याने त्यासंबंधीच्या अभ्यास व संशोधनाला चालना मिळणार आहे....
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 2430 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी https://ahilyanagaraaplesarkar.com/index.php या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 22 जून 2026 पासून 17 जुलै 2026 पर्यंत अर्ज करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध क...
असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग Surat - Chennai Greenfield expressway Route map Surat - Chennai Greenfield expressway nhai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 किमी. लांबीच्या 6-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा (टोल) या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नकाशात दर्शविल्याप्रमाणे, हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडत पुढे कुर्नुलला संपर्कव्यवस्था प्रदान करेल. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नाशिक ते अक्कलकोट दरम्यानची ही ग्रीनफिल्ड मार्गिका वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर ...