आता बँक बंद पडली तरी ठेवीदारांना पैसे परत मिळणार | bank deposit insurance programme

 

आता बँक बंद पडली तरी ठेवीदारांना  पैसे परत मिळणार


‘ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा योजना’

bank deposit insurance programme

bank deposit insurance programme‘ठेवीदार प्रथम ( Depositors First ) : पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा योजना’ हि योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या  सुरु  आली. 


एखादी बँक ढिफॉल्टमध्ये आल्यास किंवा अपयशी ठरल्यास ग्राहकांच्या ठेवी काही प्रमाणात संरक्षित केल्या जातात. याला ठेव विमा असे म्हणतात. ठेव विमा संरक्षण हे एक प्रकारचे संरक्षण कवर आहे. हे बँकेच्या ठेवीदारांना उपलब्ध आहे. डीआयसीजीसी ( Deposit Insurance and Credit Guarantee Corporation )हा विमा पुरवतो. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. सध्याच्या तरतुदीनुसार बँकेचा परवाना रद्द झाल्यावर आणि लिक्विडेशन प्रक्रिया सुरू झाल्यावर 5 लाखांपर्यंतची ठेवी सुरक्षित आहेत

या वेळी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्रीअर्थराज्यमंत्रीरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही धनादेशठेवीदारांना परत करण्यात आले.
आजचा दिवस बँकिंग क्षेत्र आणि कोट्यवधी बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहेकारण गेली कित्येक दशके भिजत घोंगडे म्हणून पडून राहिलेला हा प्रश्न आज सोडवला गेल्याचे त्यांना बघायला मिळत आहे. ठेवीदार प्रथम’ या घोषणेमागचा विचार अत्यंत महत्वाचा आहेयावर त्यांनी भर दिला. गेल्या काही दिवसात एक लाखापेक्षा अधिक ठेवीदारांना त्यांच्या कित्येक वर्षे बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाल्या. ही एकूण रक्कम 1300 कोटींपेक्षा अधिक होतीअसे पंतप्रधानांनी सांगितले.

एखादा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होऊ नयेयासाठी तो निश्चित वेळेत सोडवणे आवश्यक असतेअसे केले तर कोणताही देश जटील प्रश्नही सोडवू शकतोअसे मोदी म्हणाले. मात्रदेशात गेली अनेक वर्षे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते टाळण्याचीच प्रवृत्ती होती. आजचा नवा भारत समस्या टाळत नाहीतर त्यांना सामोरे जात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोअसेही त्यांनी सांगितले.
भारतातबँक ठेवीदारांसाठी विमा सुरक्षा व्यवस्था 60 च्या दशकातच अस्तित्वात आली होती. मात्रआधी बँकेत ठेवलेल्या एकूण ठेवीच्या रकमेपैकी केवळ, 50 हजार रुपये परत मिळण्याचीच हमी दिली जात असे. त्यानंतरही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेचजर बँक बुडलीतर ठेवीदारांना त्यांची केवळ एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळत असे."आता मात्रगरिबांच्यामध्यमवर्गीयांच्या समस्या लक्षात घेत आम्ही बुडालेल्या ठेवी परत मिळण्याच्या हमीची व्याप्ती वाढवतती पाच लाख रुपये इतकी केली आहे असे पंतप्रधान म्हणाले. दुसरी समस्या कायद्यात दुरुस्ती करुन सोडवण्यात आली आहे. पूर्वीपैसा मात्रहा पैसा कधी मिळेलयाची काहीही कालमर्यादा नव्हती. आता मात्रआमच्या सरकारने, 90 दिवसांतम्हणजेच तीन महिन्यांत ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देणे अनिवार्य केले आहे. म्हणजेजरी बँक बुडालीतरीहीठेवीदारांना त्यांची रक्कम आता 3 महिन्यात परत मिळणार आहे." असे त्यांनी सांगितले.

देशाच्या समृद्धीत बँकांची भूमिका अतिशय महत्वाचीआणि म्हणूनच बँकांच्या समृद्धीसाठी ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहणेही तेवढेच महत्वाचे आहे. आपल्याला जर बँका वाचवायच्या असतीलतर ठेवीदारांचे संरक्षण करावे लागेलअसे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षातछोट्या सार्वजनिक बँकांनामोठ्या सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करुनत्यांची क्षमताकार्यक्षमता आणि पारदर्शकता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला गेला आहेअसे त्यांनी नमूद केले. ज्यावेळीरिझर्व्ह बँक सहकारी बँकांवर देखरेख ठेवतेत्यावेळी सर्वसामान्य खातेदार आणि ठेवीदारांना बँकेविषयी विश्वास वाटतोअसे त्यांनी सांगितले.

प्रश्नकेवळ बँक खात्यांविषयीचा नव्हतातर दुर्गम भागातदूरवरच्या गावात असलेल्या बँकिंग सेवांच्या कमतरतेचाही होता. आज मात्रदेशातील जवळपास प्रत्येक गावात बँकेची शाखा पोचलेली आहे किंवा किमान पाच किलोमीटर परिसरातबँक प्रतिनिधी तरी उपस्थित आहेत. आज देशातील कोणताही सर्वसामान्य नागरिक देखील कोणत्याही ठिकाणीकुठूनहीकेव्हाही- 24 तास- अगदी लहानसेही डिजिटल व्यवहार करु शकतात. अशा सुधारणांमुळेचभारताची बँकिंग व्यवस्था, 100 वर्षातल्या सर्वात मोठ्या महामारीच्या काळातही भारताची बँकिंग व्यवस्था यामुळेच सुरळीत चालू राहिलीअसेही त्यांनी सांगितले. "ज्यावेळी जगातल्या अनेक विकसित देशसुद्धा आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी झगडत आहेतअशा वेळी भारताने मात्र देशातील जवळपास प्रत्येक घटकापर्यंत त्वरित थेट मदत पोहोचवली आहे" असे ते पुढे म्हणाले.

गेल्या काही वर्षातकेलेल्या उपाययोजनामुळेविमाबँक कर्ज आणि आणि वित्तीय सक्षमीकरणासारख्या सुविधा समाजातील उपेक्षित घटकजसे गरीबमहिलारस्त्यावरचे फेरीवाले आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. याआधी इतक्या लक्षणीय स्वरुपात बँकिंग सुविधा महिलांपर्यंत पोहोचल्या नव्हत्याअसेही त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या सरकारने प्राधान्याने या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवल्या. देशभरात जन-धन योजनेअंतर्गतजी कोट्यवधी खाती उघडली गेलीत्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त खाती महिलांची आहेत. "या बँक खात्यांचा परिणाम म्हणून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले आहे. अलीकडेच आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातही आपल्याला हे दिसून आले" असे पंतप्रधान म्हणाले.

ठेवीवरील विमा  सुरक्षासर्व प्रकारची बँक खातीअसे बचतठेवचालू खातेआवर्ती खातेअशा सर्व खात्यांवरसर्व व्यावसायिक बँकावर उपलब्ध असेल. त्यातहीठेव विमा सुरक्षा एक लाख रुपयांवरूनपाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.  पाच लाख रुपयांपर्यंतच्या विमा सुरक्षेमुळेप्रत्येक ठेवीदारालाप्रत्येक बँक खात्यात ही सुविधा लागू असेल. आधीच्या वित्तीय वर्षातया अंतर्गतदेशातील एकूण खात्यांपैकी 98.1% खात्यांना हे संरक्षण देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हीच टक्केवारी 80% इतकी आहे.

अलीकडेचया ठेव सुरक्षा विमा योजनेच्या पहिल्या हप्त्यातील अंतरिम पेमेंट तसेचपतहमी महामंडळ योजनेतील देय रक्कम ठेवीदारांना देण्यात आली. या 16   नागरी सहकारी बँकाज्यावर आता रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहेत्यांच्या खातेदारांचे दावेयाद्वारे निकाली काढण्यात आले आहे. सुमारे एक लाख ठेवीदारांना त्यांची अडकलेली 1300 कोटी रुपयांपर्यंतची ठेवत्यांच्या इतर बँकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

डिपॉझिटर्स फर्स्ट या कार्यक्रमाला महाराष्ट्रातूनही 8 मंत्री आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. मुंबईतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपुण्यातून केंद्रीय मंत्री पियुष गोयलठाण्यातून केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला सहभागी झाले होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी म्हणाले,"विम्याच्या संरक्षणात पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गातील ठेवीदारांना फायदे होणार आहेतउशिरा का होईना पण ग्राहकांना अखेर न्याय मिळाला.
केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योगमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच ठेवीदारांची चिंता होती. ते पंतप्रधान नसतानागुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तत्कालीन केंद्र सरकारला विमा संरक्षण वाढवण्यासाठी पत्र लिहिले होते.

गोयल पुढे म्हणाले यापूर्वी यासाठी 8ते9 वर्षे लागायची. ठेवी विमा कर्ज हमी योजनेच्या अंतर्गत हा कालावधी आता 90 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे बँकाच्या विश्वासार्हतेमध्ये वाढ होईल.
केंद्रीय पशुसंवर्धनमत्स्यसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी जनतेविषयी विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या सरकारच्या संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले आहे.
यावेळी मंत्र्यांनी ठेवी विमा योजनेच्या संबंधित भागातील निमंत्रित लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या परताव्याचे धनादेश वितरित केले.