दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणार || sinchan vihir yojana

दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणाररोजगार सेवकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – रोहयोमंत्री संदिपान भुमरे.

मंत्रालयात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांविषयी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, किसन कथोरे, माजी आमदार विजय गव्हाणे, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, नरेगा आयुक्त शंतनु गोयल,  जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रोजगार सहायकांच्या सेवानिवृत्ती, शासकीय सेवेत नियमित करणे, रूजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरावे, अशा विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

या चर्चे नंतर या बैठकीत शक्य असणाऱ्या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याचे श्री. संदीपान भुमरे यांनी  सांगितले.

याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटाऍडवा. यासाठी दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री.भुमरे यांनी सांगितले.

यावेळी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यातील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी संबंधित अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कामे उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश श्री.भुमरे यांनी दिले.