देशात एक कोटि कामगारांची ई श्रम कार्ड साठी नोंदणी, तर महाराष्ट्रात नोंदणी दोन लाखावर
ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची सुलभ रितीने नोंदणी करण्याच्या मोहिमेला 26 ऑगस्ट पासून आरंभ झाला, त्यावेळेपासूनच ही योजना लक्षवेधक ठरली आहे.
केवळ 24 दिवसात, एक कोटीहून अधिक (10 million ) कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. आजच्या दिवसापर्यंत 1,03,12,095 कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे.
यापैकी सुमारे 43% लाभार्थी महिला तर 57% पुरुष कामगार आहेत. महाराष्ट्रात एक ते तीन लाख दरम्यान नोंदणी झाली आहे.
बांधकाम क्षेत्र, तयार कपड्यांचे उत्पादन, मासेमारी, रोजंदारी करणारे मजूर आणि फलाटावर काम करणारे मजूर, रस्त्यावरील व्यवसाय (फेरीवाले), घरगुती काम, शेती आणि त्या संबंधित क्षेत्र, वाहतूक क्षेत्र इत्यादी विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याच्या दृष्टीने प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे.
स्थलांतरित कामगार देखील आता ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगार-आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
ऑनलाइन नोंदणीसाठी, कामगार वैयक्तिकपणे ई-श्रमच्या मोबाइल ॲप'चा ( E shram mobile application ) अनुप्रयोग करु शकतात किंवा वेबसाइट वापरू शकतात.
या पोर्टलमध्ये कामगार स्वतःची नोंदणी करण्यासाठी स्वतः online, सीएससी, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, पोस्टाच्या निवडक टपाल कार्यालयांना भेट देऊन या पोर्टलवर आपली नोंदणी करु शकतात.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, असंघटित कामगारांना डिजिटल ई-श्रम कार्ड मिळेल.
watch video how to apply E shram card online
आणि ते डिजिटल ई-श्रम कार्ड पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचे प्रोफाइल/ तपशील अद्ययावत करू शकतील. तसेच त्यांना सर्वसमावेशक खाते क्रमांक (डिजिटल ई-श्रम कार्डवर- eSHRAM युनिव्हर्सल अकाउंट नंबर UAN ) मिळेल जो देशभरात स्वीकारला जाईल.
कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. जर एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली असेल आणि त्याला अपघाती मृत्यू आला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले तर रुपये 2.0 लाख आणि आंशिक अपंगत्व आल्यास रुपये 1.0 लाख इतके अर्थसहाय्य मिळण्यास तो कामगार पात्र असेल.