पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री आर.के. सिंह यांनी 21.9.2021 रोजी चार वेगवेगळ्या सत्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा मंत्री, ऊर्जा सल्लागारांसह प्रादेशिक स्तरावरील बैठका आयोजित केल्या होत्या.
यात त्यांनी नवीन सुधारणांवर चर्चा केली. 
यावेळी ऊर्जा मंत्री श्री सिंग यांनी मंत्र्यांना त्यांच्या राज्यांना कृषी फीडरच्या सौरकरणासाठी पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. 


योजना राबवित असताना कमकुवतपणा दूर केला पाहिजे आणि  वाढत्या मागण्या विचारात घेतल्या पाहिजेत. त्यांनी नमूद केले की योजनेने 10 वर्षांत काय मागणी असेल ते विचारात घेतले पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी यंत्रणा तयार केली पाहिजे. याचप्रमाणे प्रणालीचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 
यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी असेही सांगितले की लवकरच ते आणि त्यांचे अधिकारी राज्यांना भेटतील आणि राज्य ऊर्जा मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बसून त्यांची योजना आखतील.

श्री आर.के.सिंह यांनी मंत्र्यांना त्यांच्या राज्यांना कृषी फीडरच्या सौरकरणासाठी पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. कृषी फीडरच्या सोलरायझेशनमुळे शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळी मोफत किंवा पहिल्या दिवसापासून अत्यंत कमी किंमतीत वीज उपलब्ध होऊ शकते.
 कृषी क्षेत्रातील विजेच्या वापरासाठी राज्य त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाची मोठी रक्कम वाचवतील. 
 रूफटॉप सोलरला पर्यावरण अनुकूल पद्धतीने वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.