डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २१-२२ मध्ये राबविण्यास मंजुरी || babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2021

 babasaheb ambedkar krushi swavalamban yojana २०२१ - २२

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱयांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य शासन विविध योजना आखत असते. राज्यातील बळीराजांसाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना सुरू केली आहे. ही योजना मात्र राज्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. सत्तेवर येणारे कोणतेही सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी आग्रही असते. 

यामुळे राज्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी सुखी समाधानी व्हावा, यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणली आहे.

हीच योजना सन २०21-22 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता मिळाली आहे.
लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.  शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.  शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे नवीन विहिरी साठी किमान 0.40 हेक्टर, इतर योजना 0.20 व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे, ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. 

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील. 

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. . कृषी विभागाच्या https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login 

या संकेतस्थळावर