शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया माहिती. गट नोंदणी अर्जं नमुना - आत्मा || Atma shetkari gat nondani

 

आत्मा गट नोंदणी, अटी, पात्रता कागदपत्रे 

Atma shetkari gat nondani

Atma shetkari gat nondani

शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया माहिती. 


शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवित असते. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन शेती संबंधित उद्योग,पशुसंवर्धन,मत्स्य पालन व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय यादीमध्ये शेतकऱ्यांना प्रगती करणे सोपे होते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र शासनाच्या सगळे योजनांची प्राधान्य ते प्रथम शेतकरी गटाला दिले जाते.विविध उद्योगात बाबतीतली प्रशिक्षण देणे,यासंबंधीचे अनुदान देणे इत्यादी बाबींचा लाभ दिला जातो.

कृषि संशोधक, विस्तार कार्यकर्ते, शेतकरी व इतर भागधारक (अशासकीय संस्था, सार्वजनीक, सामुदायीक व खाजगी क्षेत्र इत्यादी) यांची संयुक्त सांगड घालून त्यांचा अभ्यास करुन जिल्हा विस्तार आराखडा व स्थानीक गरजा व परिस्थितीशी निगळीत तंत्रज्ञान प्रसारणातील नाविण्यापुर्णतेशी परिचीत करणे (सुरुवात करणे) या करिता शिफारशी करुन या सर्वाना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आत्माची आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर, हा प्रकल्प जिल्हात कृषि विकासाला गती देण्याकरिता मागणीनुरुप, निश्चीत परिस्थित, विविध विषयाशी संबंधीत संशोधन विस्तार आराखडा विकसीत करण्यासाठी आत्मा संस्था ही अनिवार्य आहे. यथार्थदर्शी संशोधन विस्तार आराखडा करण्यासोबतच आवश्यक विकासात्मक कार्य कोणामार्फत करावे. याबाबत सुध्दा SREP मध्ये पायाभुत माहिती देण्यात आलेली आहे.

आत्मा ही एक स्वायत्त संस्था आहे. आत्मा नियामक मंडळ सर्वसमावेश दिशादर्शक धोरण ठरवेल नियामक मंडळ, प्रकल्प संचालक आत्मा, प्रकल्प उपसंचालक, आत्मा व सहाय्यक कर्मचारी यांचे सहकार्याने कामकाज करतील. आत्मा व्यवस्थापन समिती (AMC) ही योजना अंमलबजावणीसाठी कार्यकारी शाखा असेल. जिल्हा स्तरावरील जिल्हा शेतकरी सल्ला समिती ही जिल्हा कृषि विस्तार नियोजन व अंमलबजावणी मदत करेल यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा (SREP) तयार करण्याबरोबरच जिल्हयातील संपूर्ण कृषि विस्तार व्यवस्थापन व नियोजन समर्पित कर्मचार्याच्या मदतीने संस्था कार्य करेल.

तालुका/गट तंत्रज्ञान चमू (BTT) ज्यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभागातील गट/तालुका स्तरावरील अधिकारी असतील गट शेतकरी सल्ला समिती (BFAC) ज्यामध्ये प्रगतीशील व अनुकरणीय शेतकरी असतील, त्यांचे तालुका पातळीवरील कृषि विस्तार नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असेल. गट शेतकरी सल्ला समितीत निवडलेले शेतकरी हे प्रामुख्याने शेतकरी/कृषि विज्ञान मंडळ, शेतकरी समुह यांचेतुन चक्राकार (रोटेशन) पध्दतीने निवडण्यात यावेत जे तालुका तंत्रज्ञान चमुस वेळोवेळी मार्गदर्शन करतील. तालुका आत्मा कक्षामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हे BTT व BFAC च्या मदतीने तालुका कृति आराखडा तयार करणे व अंमलबजावणी संदर्भात जबाबदारी पार पाडतील.

शेतकरी मित्र हा कृषि विस्तार यंत्रणा व शेतकरी यांचेतील महत्वाचा दुवा असेल. प्रत्येकी दोन गावांसाठी 1 शेतकरी मित्र निवडला जाईल. शेतक­यांना कृषि संलग्न विभागाबाबत मार्गदर्शन करणेसाठी शेतकरी मित्र उपलब्ध असेल. शेतकरी, शेतकरी सेवा केंद्र इ. विस्तार कार्यक्रमांबाबत माहितीची देवाण-घेवाण करणे संदर्भात शेतकरी मित्राची मदत होईल. (ii) ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे कृषि व्यावसायिकांना तांत्रिक सहाय्य देऊन कृषि विस्तारामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. (iii) तालुक्यात कृषि व कृषि संलग्न विषयाच्या शेतीशाळा घेण्यात याव्यात.


आत्मा यंत्रणेकडे गट नोंदणी करन्यासाठी खालील प्रमाणे अटी आहेत. 


वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी यांचे गट तयार करणे यामध्ये अपेक्षीत आहे.

एका गटा मध्ये 20-25 शेतकरी असावेत. 

गटाच्या सदस्यांची बैठक महिन्यातून किमान एक वेळा होणे अपेक्षीत आहे. 

तालुक्यातील त्या त्या पिकांचे गट एकत्र येउन गटांचा तालुका स्तरावर संघ करता येइल. 

तसेच सर्व तालुक्यातील त्या विशिष्ट पिकाचे गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता येइल. 

गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या  नोंद वह्या व रजिस्टर तसेच रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. उदा. बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इ . 

1.या गटांना क्षमता वृद्धी, कौशल्य विकास यासाठी रु.5000 प्रती गट या प्रमाणे सहाय्य करण्यात येते.

2.तसेच सक्षम गटास बीज भांडवल/फिरता निधी यासाठी रु.10000 प्रती गट याप्रमाणे सहाय्य करण्यात येते.

3.याव्यतिरिक्त महिलांचे अन्न सुरक्षा गट तयार करण्यात येतात. या गटांना परसबाग, कुक्कुट पालन, शेळी पालन, अळिंबी ऊत्पादन, पशू संवर्धन इ . व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण, प्रकाशने व निविष्ठा खरेदी यासाठी रु.10000 इतके बीज भांडवल देण्यात येते.

4. उत्कृष्ट रित्या संघटीत असणारा व कार्य करणारे शेतकरी गटास रु.20000 इतके पारितोषीक देण्यात येते.

आत्मा यंत्रणेकडे गट नोंदणी आवश्यक कागदपत्र- 

  • गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त 
  • सदसयांचे वैयक्तिक अर्ज 
  • सदस्यांचा ७/१२ व ८ अ 
  • ओळख पत्र - आधार कार्ड / मतदान कार्ड 
  • गटाचा करारनामा 
  • गट नोंदणी फी रु. १००


गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबविण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. 

सदर योजनेअंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजनेअंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी सहकार्य भावना निर्मित करणे हे गट शेतीचे उद्दिष्ट्य आहे. 

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास मान्यता GR 





गट नोंदणी अर्जं नमुना 
अर्जाचा नमुना