शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! परदेश अभ्यास दौरा योजना 2026 जाहीर | Shetkari Pardesh Abhyas Daura Scheme
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! परदेश अभ्यास दौरा योजना 2026 जाहीर Shetkari Pardesh Abhyas Daura Scheme महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीविषयक ज्ञान वाढवण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. सन 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. GR PDF येथे पहा 👇🏻 सन 2026-27 मध्ये राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. योजनेचा मुख्य उद्देश प्रगत देशामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देणे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील शेतमालांची मागणी कृषीमालांची प्रक्रिया व शेतमालाच्या निर्यातीबाबत ज्ञान मिळवून देणे. दौऱ्या दरम्यान परदेशातील शेतकऱ्यांशी थेट चर्चा करणं तिथल्या शेतजमिनी आणि संबंधित संस्थांना भेटी देऊन क्षमता व...