10वी 12 वी परीक्षा अंतिम वेळापत्रक जाहीर | Board Exam Maharashtra 2027

दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर.

Time Table Declared for Maharashtra Board Exam 2027

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या लातूर छत्रपती संभाजी नगर नागपूर पुणे मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक व कोकण विभागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फेब्रुवारी मार्च परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पालक व संबंधित शाळा महाविद्यालयाने परीक्षेचे वेळापत्रकाची नोंद घ्यावी असा आवाहन करण्यात आलेला आहे. 

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षा या सोमवार 8 फेब्रुवारीपासून ते गुरुवार 18 मार्च 2027 पर्यंत घेतल्या जाणार आहेत तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन हे 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये घेतले जाणार आहे. 

तर इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा सोमवार 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027 या कालावधीमध्ये घेतल्या जातील व प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन हे 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये घेतले जाणार आहे.

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणार वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ दिपक माळी यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi