Kharip Paisewari 2026 अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब या जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाखाली!

अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब या जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी 50 पैशाखाली.

दुष्काळाचा तिसरा ट्रिगर लागू 

Kharip Paisewari 2026

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुष्काळाचे पुढील ट्रिगर देखील लागू होणे गरजेचे असते.


 

यामधील एक महत्त्वाचा असा ट्रिगर म्हणजे पिकांची पैसेवारी पिका कापणीच्या आधारे नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. आणि आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात ही नजर अंदाज पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्याची सरासरी नजर अंदाज पैसेवारी 47 पैसे इतकी जाहीर

यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम 2026 मध्ये लागवडी योग्य असलेल्या 2052 गावांमध्ये नजर अंदाज पैसेवारी काढण्यात आली जी सरासरीच्या 47 पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे.


 

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यामध्ये 47 पैसे उमरखेड तालुका 47 पैसे कळम तालुका 47 पैसे महागाव तालुका 48 पैसे आरणी तालुका ४७ पैसे बाबुळगाव तालुका 48 पैसे केळापूर तालुका 49 पैसे घाटंजी तालुका 47 पैसे दारवा तालुका 47 पैसे अशीही पैसेवारी जाहीर करण्यात आले आहे.

तर राळेगाव तालुक्यामध्ये 48 पैसे दिग्रस तालुका 47 पैसे वणी तालुका 48 पैसे नेहेर तालुका ४७ पैसे मालेगाव तालुका 46 पैसे पुसद तालुका ४८ पैसे जरी जामनेर तालुका 49 पैसे अशी यवतमाळ जिल्ह्यातील 2052 गावाची सरासरी पैसेवारी 47 पैसे जाहीर करण्यात आलेले आहे.


बुलढाणा जिल्ह्याची सरासरी नजर अंदाज पैसेवारी 43 पैसे इतकी जाहीर

बुलढाणा जिल्ह्यात ही दुष्काळांचा पिकांवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावाची नजर अंदाज पैसेवारी देखील 50 पैसे पेक्षा कमी आलेले आहे जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 43 पैसे इतकी आहे. 

यामध्ये जळगाव जामोद तालुका 48 पैशासह सर्वाधिक पैसेवारी असलेला तालुका आहे तर बुलढाणा तालुका हा 31 पैशाचा सर्वात कमी पैसेवारी असलेला तालुका आहे. 

याचप्रमाणे मेहकर तालुक्याची सरासरी पैसेवारी 45 पैसे लोणार तालुका 46 पैसे मलकापूर तालुका 46 पैसे मोताळा तालुका 46 पैसे शेगाव तालुका 46 पैसे संग्रामपूर तालुका 46 पैसे चिखली तालुका 38 पैसे देऊळगाव राजा 43 पैसे सिंदखेडराजा तालुका 43 पैसे नांदुरा तालुका 43 पैसे व खामगाव तालुका 42 पैसे अशी ही नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

खरीप वाया, पैसेवारी ४०.३१ पैसे; ९६५ गावांमध्ये दुष्काळ

घनसावंगी तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून तेथील पैसेवारी २८.६४ पैसे आहे. अंबडमध्ये ३५.५९, जालना ४०.३९, बदनापूर ४०.८७, परतूर ४१.०८, भोकरदन ४३.७५, मंठा ४४.८१ तर जाफराबादेत ४७.३३ पैसे अशी पैसेवारी नोंदवली आहे

अमरावती जिल्ह्यातील ९१० गावांची पैसेवारी ४४ पैसे एवढी जाहीर करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व १३५४ गावाचे पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी. 

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील छत्रपती संभाजी नगर शहर 40 गावांची पैसेवारी 46 पैसे इतकी आली आहे. संभाजीनगर तालुका 154 गावाचे पैसेवारी 46 पैसे पैठण 189 गावाचे पैसेवारी 46.11 पैसे फुलंब्री 92 गावाचे पैसेवारी 49 पैसे वैजापूर 164 गावांचे पैसेवारी 44 पैसे तर गंगापूर तालुक्यातील 222 गावांचे पैसेवारी 48.07 पैसे इतकी आली आहे.

याचप्रमाणे खुलताबाद तालुक्यातील 76 गावांचे पैसेवारी 46 पैसे सिल्लोड तालुक्यातील 132 गावांचे पैसेवारी 46 पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे गावांचे पैसेवारी 44 पैसे तर सोयगाव तालुक्यातील 84 गावाचे पैसेवारी 45 पैसे अशी एकूण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील १३५४ गावांचे पैसेवारी ही सरासरी 46.22 पैसे इतकी आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील 1574 गावाचे पैसेवारी 39 पैसे. 

नांदेड जिल्ह्यात देखील खरिपाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नांदेड १०२ गावांची पैसेवारी ४२ पैसे, अर्धापूर ६६ गावांची पैसेवारी ४४ पैसे, कंधार १२६ गावांची पैसेवारी ३८ पैसे, लोहा १२६ गावांची पैसेवारी ४१ पैसे जाहीर करण्यात आली आहे.

भोकर ७९ गावांची पैसेवारी ४१.१८ पैसे, मुदखेड ५६ गावांची पैसेवारी ४४ पैसे, हदगाव १३७ गावांची पैसेवारी ४५ पैसे, हिमायतनगर ६४ गावांची पैसेवारी ४३ पैसे, किनवट १९१ गावांची पैसेवारी ४३ पैसे, माहूर ८४ गावांची पैसेवारी ४२ पैसे, देगलूर १०८ गावांची पैसेवारी ४२ पैसे आली आहे.

मुखेड १३५ गावांची पैसेवारी ४० पैसे, नायगाव ८९ गावांची पैसेवारी ३९ पैसे, धर्माबाद ५६ गावांची पैसेवारी ४४ पैसे, उमरी ६३ गावांची पैसेवारी ४३.७५ इतकी जाहीर करण्यात आली असून नांदेड जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ३९ पैसे आली आहे.

अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाखाली 

अकोला जिल्ह्यातील १ हजार १२ महसुली गावांपैकी खरीप लागवडीयोग्य ९९० गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सरासरी पैसेवारी ४४ पैसे आली आहे. 

अकोला जिल्ह्यात पातूरची पैसेवारी सर्वांत कमी ४० पैसे आहे. अकोला ४६, अकोट ४५, तेल्हारा ४५, बाळापूर ४२, मूर्तिजापूर ४४ आणि बार्शीटाकळी ४४ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील ९५२ गावांची पैसेवारी ४१ पैसे

लातूर १२४ गावांची पैसेवारी ३८ पैसे, औसा तालुक्यातील १३३ गावांची पैसेवारी ३८ पैसे, रेणापूर तालुक्यातील ७६ गावांची पैसेवारी ३९ पैसे जाहीर करण्यात आली आहे.

तर जळकोट तालुक्यातील ४७ गावांची पैसेवारी ४८ पैसे, अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ३९ पैसे, चाकूर तालुक्यातील ८५ गावांची पैसेवारी ३८ पैसे जाहीर करण्यात आली आहे.

याचप्रमाणे निलंगा तालुक्यातील १६२ गावांची पैसेवारी ४५ पैसे, देवणी तालुक्यातील ५४ गावांची ३८ पैसे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४८ गावांची पैसेवारी ४४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

#Paisewari #KharifSeason2026 #Buldhana #Yavatmal

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

3.55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi