Dushkali Madat GR अखेर ₹५००० दुष्काळी मदतीचा शासन निर्णय आला! असे होणार वाटप | हे शेतकरी अपात्र

शेतकऱ्यांना ₹५००० दुष्काळी मदत अग्रिम, GR आला 

असे होणार वाटप | हे शेतकरी अपात्र 

Dushkali Madat GR

राज्यात खरीप हंगाम 2026 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून रुपये पाच हजार अग्रीम स्वरूपामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

या संदर्भातील शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून शासन निर्णय आपण खाली लिंक वरती पाहू शकता. 

GR PDF 👇🏻👇🏻

सन २०२६ च्या खरीप हंगामातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना रू. 5000/- अग्रिम मदतीबाबत.

या शासन निर्णयानुसार राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानी संदर्भात रुपये पाच हजार रुपयाची अग्रीम नुकसान भरपाई प्रति शेतकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून राज्यातील दीड कोटी बाधित शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा वाटप केले जाणार आहे. 

या नुकसान भरपाई चे वाटप करण्यासाठी काही निकष देण्यात आलेले आहेत. 

  1. दुष्काळी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त झाले असेल अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मदत रुपये पाच हजार रुपयांचा वाटप करण्यात येईल.
  2. दिली जाणारी मदत ही 304 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून दिली जाईल.
  3.  एक नोव्हेंबर 2025 ते आज रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत केवायसी केलेले असेल अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. मदतीचा वितरण केलं जात असताना ज्या वनपट्ट्याधारक शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना एक केवायसीद्वारे अग्रिम मदत देण्यात येईल.
  4. या मदतीमध्ये भूतपूर्व किंवा विद्यमान आमदार खासदार याच प्रमाणे जिल्हा परिषद सदस्य विधान परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका नगरसेवक हे अपात्र असणार आहेत. 
  5. याच पमाणे राज्य शासनाचे केंद्र शासनाचे किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील विविध महामंडळाचे 25 हजार रुपये पेक्षा जास्त वेतन घेत असलेले कर्मचारी अधिकारी देखील या मदतीला अपात्र असणार आहेत.
  6. याचप्रमाणे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने सहकारी सूतगिरण्या नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या सर्व सहकारी संस्था मधील 25000 पेक्षा जास्त वेतन घेत असलेले कर्मचारी या मदतीसाठी अपात्र असतील मात्र सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार या मदतीसाठी पात्र असणार आहेत.

शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या या मदतीमधून बँकांनी कोणत्याही प्रकारच्या वसुल्या करू नये इतर अन्य वसुलीसाठी ही रक्कम वळती करू नये अशा प्रकारच्या सूचना देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.


#DushkalMadat5000 #DushkalMadatGR #DushkalMadat2026 #MaharashtraDushkal #ShetiYojana #PrabhudevaGR #FarmerID #304DushkaliTaluka #DBTMadat #ShetkariYojana #FarmerWelfare #GovtResolution #MaharashtraShetkari

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi