दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० अग्रिम मदत येणार | Dushkal Bharpai 2026
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ₹५००० अग्रिम नुकसान भरपाई जमा होणार
Dushkal Bharpai 2026
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2026 मध्ये 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करून दुष्काळाच्या सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या याच्यामध्ये बदल करत 14 ऑक्टोबर 2026 रोजी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला आणि दुसरा ट्रिगर लागू करण्यात आलेला असून या 304 तालुक्यांना दुष्काळाच्या बारा सवलती लागू करण्यात आले आहेत.
दुष्काळी जाहीर करण्यात आलेल्या या 304 तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून अग्रीम नुकसान भरपाई म्हणून 5000 रुपयाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
दुष्काळी भागातील कोणत्याही शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावू नये अशी सक्त ताकीद शासनाच्या माध्यमातून सोसायटी या जिल्हा बँका राष्ट्रीयीकृत बँका व मायक्रो फायनान्स यांना दिली आहे.
दुष्काळ जाहीर केलेल्या 304 तालुक्यांमध्ये कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादार न लावणं पीक कर्जाचे पुनर्गठन करणे याचबरोबर शेतीसाठी साडेसात अश्वशक्ती पर्यंत वीजपुरवठा मोफत असल्याने त्यापुढील क्षमतेच्या वीज कनेक्शन साठी वीज बिलात सवलत देणं अशा प्रकारच्या सवलती लागू करण्यात आलेले आहेत.
दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचा निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जनावरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत चारा विकास योजनेचे निकषांमध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत.
जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे चाऱ्याच पिकांची लागवड करणं तसेच रब्बीमध्ये ज्वारी सारख्या पिकांना प्राधान्य देणे अशा प्रकारचे प्रयत्न आता कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे जनावरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांकडून लागवड करण्यात येणाऱ्या चाऱ्याचे शासन हमीभावाने खरेदी करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
GR PDF 14.10.2026