6 रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर ! | Rabi Crop MSP Announced 2026

रब्बी हंगाम 2026-27  केंद्राकडून 6 पिकांचे हमीभाव जाहीर !

Rabbi Crop MSP Announced 

केंद्र शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2026-27 सहा महत्त्वाच्या पिकांचे किमान आधारभूत मूल्य हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. 


मात्र हे हमीभाव जाहीर केले जात असताना ज्या मुख्य पिकांची शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात त्या पिकांचे हमीभाव अतिशय कमी प्रमाणात वाढवण्यात आलेले असून ज्या पिकांचे उत्पादन शेतकरी कमी घेतात अशा पिकांना जास्त हमीभाव देऊन प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे.

रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले जात असताना देशातील खाद्य तेलाचे उत्पादन वाढवण्याच्या अनुषंगाने तेलबियाच्या हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेले असून करडीच्या हमीभावामध्ये यावर्षी सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल अश वाढ करण्यात आलेले आहे तर मोहरीच्या हमीभावामध्ये 413 रुपयाची वाढ करण्यात आलेले आहे.

या जाहीर केलेल्या हमीभावामध्ये गहू आणि हरभरा यासारख्या मुख्य रब्बी पिकाच्या हमीभावात मात्र खूप कमी प्रमाणात वाढ केलेले आहे गव्हाच्या हमीभावामध्ये अवघी 25 रुपयाची तर हरभऱ्याच्या हमीभावामध्ये 83 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. 

Rabbi MSP 2026

पिकाचे नावनवीन हमीभाव २०२७-२८ (₹/क्विंटल)मागील वर्षाच्या तुलनेत झालेली वाढ (₹/क्विंटल)
करडई (Safflower)७,२१५६७५ (सर्वाधिक)
मोहरी / रेपसीड६,६१३४१३
मसूर७,३९०३९०
जव (बार्ली)२,२८६१३६
हरभरा (Gram)५,९५८८३
गहू (Wheat)२,६१०२५

गेल्या अनेक दिवसापासून देशभरातील शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभावामध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत परंतु प्रमुख पिकांसाठी ती वाढ करण्यात आलेली नाही. यावर्षी असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी होणारे उत्पादन आणि प्रमुख पिकांना कमी प्रमाणात वाढ झालेले हमीभाव यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाईलाजाने कमी भावात विकावा लागणार आहे.

#RabiMSP #हमीभाव

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

3.55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi