MahaBhumi Stack Portal आता जमिनीची पूर्ण कुंडली आता एका क्लिकवर, महाभूमी स्टॅक प्रणाली सुरू
जमिनीचे सर्व अभिलेख आता एकाच प्लॅटफॉर्मवर!
'महाभूमी स्टॅक' प्रणालीचा शुभारंभ! आता जमिनीची पूर्ण कुंडली एका क्लिकवर
Mahabhumi Stack Portal
महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी 'महाभूमी स्टॅक' या एकात्मिक प्रणाली विकसित केली आहे.
या mahabhumi Stack Portal चा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आला.
मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
या महा-डिजिटल भांडारात ३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख, १.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका, ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख तसेच नोंदणी विभागाचे दस्त क्र. २ च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती उपलब्ध आहे.