मुक्तसंचार गोठा व दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना | Jilha Parishad Cess fund Scheme Ahilyanagar

मुक्तसंचार गोठा व दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना

Jilha Parishad Cess fund Scheme Ahilyanagar

राज्यात जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी पशुपालक महिला विद्यार्थी यांच्यासाठी योजना राबवल्या जातात अशाच प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी दोन महत्त्वाचे असे योजनांकरता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 

पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दूध उत्पादन वाढविणे, पशुधनाची योग्य निगा राखणे तसेच पशुपालकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या उद्देषाने जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत जिल्हा परिषद सेस निधीमधून मुक्तसंचार गोठा आणि दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून जनावरांना मोकळ्या व हवेशीर वातावरणात ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पशुधनाच्या आरोग्य व व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. मुक्त संचार गोठा उभारणीसाठी जिल्हा परिषद सेस निधीमधून 50 टक्के किंवा रु 20000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसायातील श्रम कमी करण्यासाठी दूध काढणी यंत्र खरेदीसा्ठी अनुदान उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यसामध्ये जिल्हा परिषद सेस निधीमधून 60 टक्के किंवा रु 15000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.

या आधुनिक सुविधांमुळे दूध काढण्याची प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ व वेळेची बचत करणारी होण्यास मदत होणार आहे. पुशपालकांनी संबंधित योजनेची माहिती व अर्ज करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलयाशी संपर्क साधावा. 

वरील योजनाचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलायामार्फत दि. 24 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वीकारण्यात येतील. तरी पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

#KrushiYojana #SataraZP #AgricultureScheme #ShetkariMitra #MaharashtraFarmers #Subsidy

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi