Zilla Parishad Scheme 50% अनुदानावर ट्रॅक्टर सह कृषी यंत्र अवजारे, जिल्हा परिषद उपकर योजना अर्ज सुरू.

जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना 50% अनुदानावर ट्रॅक्टर सह कृषी यंत्र अवजारे 

Zilla Parishad Scheme 2026 jalna

राज्यात जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत कृषी विभाग समाज कल्याण महिला बालविकास अशा विविध विभागांच्या योजना राबवल्या जातात. यामध्येच आता जिल्हा परिषद उपकर योजना अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.


 

कृषी विभाग जिल्हा परिषद जालना मार्फत जिल्हा परिषद उपकारी योजना 2026 27 अंतर्गत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह रोटरावेटर, श्रेडर, मनुष्यचलित टोकन यंत्र, अशा प्रकारची अवजारे अनुदानावरती उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर 20 PTO HP किंवा त्यापुढील क्षमतेचा 50% अनुदानावरती जास्तीत जास्त एक लाख 25 हजार रुपये अनुदान मर्यादेमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे, तर ट्रॅक्टरचलित रोटरावेटर साठी 36 हजार 800 रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना 50% किंवा जास्तीत जास्त 8000 रुपयांच्या मर्यादेमध्ये मनुष्यचलित टोकन यंत्र देखील या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत याच प्रमाणे स्ट्रा चॉपर, श्रेडर, मल्चर माउंडेड इत्यादी अवजारांसाठी जास्तीत जास्त 40% किंवा 58 हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाणार आहे. 

जिल्हा परिषद उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीजवळ स्वतःच्या नावे जमिनीचा 7/12, 8 अ उतारा
  • आधार कार्ड, 
  • बँक पासबुक 
  • ट्रॅक्टरचलीत औजारांसाठी अर्जदाराचे स्वतःच्या नावे असलेले ट्रॅक्टर RC  Book आवश्यक आहे

जालना  जिल्ह्यातील शेतक-यांनी योजनेचा लाभ घेणे करीता संबंधीत पंचायत समिती स्तरावर दि. 19 ऑगस्ट 2026 ते दि. 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत. 

या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करून सहभाग नोंदवावा असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, आणि कृषी विकास अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi