Shetkari Karjmafi KYC Farmer Id Issue: फार्मर आयडीची अट शिथिल करणेबाबत मंत्रालयात बैठक
शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी फार्मर आयडीची अट शिथिल करणेबाबत मंत्रालयात बैठक
Shetkari Karjmafi KYC Farmer Id Issue
राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात असून यया योजनेच्या अंमलबजावणी मध्ये Agristack Farmer ID बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र राज्यात २ लाख ३१ हजारा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे काही तांत्रिक अडचणींमुळे 'फार्मर आयडी' अद्याप निघालेले नसून कर्जमाफीच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागणार कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अशाचप्रकारे जवळजवळ १७०५ शेतकरी आहेत. यावरती तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व कृषी विभागाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या सर्व अडचणींची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठवून त्याचा एक स्वतंत्र फॉरमॅट तयार करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ दिवसांत अहवाल मागविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यामुळे सिंधुदुर्गासह राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा 'ॲग्रीस्टॅक' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक निघू शकत नाही, त्यांच्याकडून इतर पर्यायी कागदपत्रे घेऊन मार्ग काढण्यात येणार आहे.
जे खऱ्या अर्थाने शेतकरी आहेत, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.