PMAY-G Gharkul Yadi घरकुल लाभार्थींची यादी निश्चित होणार

घरकुल लाभार्थींची यादी निश्चित होणार

PMAY-G Gharkul Yadi


प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलेले असून त्या लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी स्वातंत्र्यदिनी येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून बेघर व कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आले. काही कुटुंबांची तालुका स्तरावरून चेकर नेमून नमुना पडताळणी करण्यात आली. 

कुटुंबांची मसुदा प्रतीक्षा यादी तालुकास्तरावर प्राप्त झालेली असून ती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीस दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. PMAYG AAWAS PLUS २०२४  कायम प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन येईल. मसुदा घरकुल लाभार्थी यादी ग्रामसभेत नागरिकांसमोर सादर केली जाईल.

मसुदा यादीवर नागरिकांकडून त्यांना असलेल्या हरकती, सूचना किव्हा शिफारसी मागितल्या जातील. प्रत्येक लाभार्थ्याची माहिती व पात्रतेची पडताळणी केली जाईल. चुकीची नावे, अपात्र लाभार्थी किंवा आवश्यक बदलांबाबत ग्रामसभा शिफारस करेल. ग्रामसभेच्या शिफारशींच्या आधारे अंतिम कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी आवास प्लस प्रणालीद्वारे डिलिशन मॉड्यूल कार्यवाही पूर्ण झाली असून आता ग्रामसभा कार्यवाही आणि प्राधान्य यादी (PMAY-G Gharkul Yadi PWL) अंतिम करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.

ग्रामसभेने सुचविलेले बदल AwaasSoft प्रणालीमध्ये नोंदवावेतसर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम  लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी कायम प्रतीक्षा यादी उपलब्ध असणे आवश्यक असून, सर्व बदल केवळ ग्रामसभेच्या शिफारशीनुसारच करण्यात येणार आहेत. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड करू नयेत, अशा सूचना संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Gharkul hamipatra


दि. १५ ऑगस्ट, २०२६ रोजीच्या ग्रामसभेमध्ये अजेंड्यामध्ये कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ( PMAY-G Gharkul Yadi PWL) अंतिम करावी. मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामसभेसमोर सादर करून लाभार्थ्यांच्या पात्रतेची Fact based पडताळणी करावी. ग्रामसभेने सूचविलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये (Beneficiary Facts) सर्व शिफारसी व बदलांची आवश्यक सुधारणा करावी. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (Final PWL) तयार करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Gharkul Press Note

घरकुल लाभार्थी यादी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सर्वेक्षण होऊनही घरकुल लाभार्थी यादीत नाव समाविष्ट न झाल्याबाबत अर्ज 

 #PMAYG #PradhanMantriAwasYojana #GharKulYojana #AwaasPlus

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

3.55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi