जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार; राज्यात विशेष अभियान | Mahatma Jyotirao Phule Mahsul Lok Adalat 2026

जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार; राज्यात विशेष अभियान

महसुली दावे, वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारचा महसुल लोक अदालत घेण्याचा निर्णय

Mahatma Jyotirao Phule Mahsul Lok Adalat 2026

राज्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष जमिनीचे वाद महसुली दावे ही सुरू असतात आणि ती प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. या प्रकरणावरती शेतकऱ्यांना अमाप पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. 

ग्रामीण भागामध्ये प्रलंबित असलेले जमिनीचे वाद आणि महसुली दावे हे कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाने 14 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक आदालत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात एक सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2017 20 या सात महिन्याच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. 

राज्यातील मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील प्रलंबित असलेले दावे या आदालतीच्या माध्यमातून निकाली काढले जाणार आहेत. 

१ सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2017 या सात महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक तीन महिन्यातून एकदा सर्व स्तरावरती लोक आदालतीचा आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या न्यायालयात किंवा कार्यालयात दावा प्रलंबित असेल तेथील दोन्ही पक्ष किंवा त्यांच्या वकिलामार्फत शासनाने विहित नमुन्यात दिलेले प्रपत्र हा अर्ज सादर करावयाचा आहे. 

अर्जाचा नमुना खालील लिंक वरती मिळेल. 

दि. 1 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 मार्च, 2027 या कालावधीमध्ये महात्मा जोतिराव फ़ुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्याबाबत

शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या या अर्जाची छाननी करून दोन्ही बाजूच्या सहमतीनं कायदेशीर तडजोड केली जाईल आणि निश्चित केलेल्या लोक आधारले तिच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीमध्ये अंतिम आदेश पारित केले जातील आणि प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढले जाईल. 

प्रलंबित असलेली प्रकरण निकाली निघाल्यामुळे वारंवार मारावयाच्या कोर्टाच्या फेऱ्या किंवा वकिलांचा खर्च यामधून शेतकऱ्यांची सुटका होणार असून शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे. 

शासन निर्णय खालील लिंक वरती पहा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi