Kotwal Bharti 2026 राज्यात 2912 पदांची महसूल सेवक भरती, अटी शर्ती कागदपत्र पहा सविस्तर

राज्यात 2912 महसूल सेवक पदांची मेगापद भरती

शैक्षणिक पात्रता वय परीक्षा अर्ज कोणत्या जिल्ह्यात किती जागा सविस्तर माहिती. 

Kotwal Bharti 2026

राज्यात महसूल व वन विभागाच्या माध्यमातून 19 ऑगस्ट 2026 रोजी एक परिपत्रक काढून 2912 रिक्त असलेल्या महसूल सेवक कोतवाल पदाच्या पदभरतीच्या भरतीला मंजुरी दिलेली आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यातील 31 मे 2026 पर्यंत रिक्त असलेली 2912 कोतवाल पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आलेले असून 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पद भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. रिक्त असलेल्या 2912 जागाच्या या कोतवाल सेवक पदभरतीची प्रक्रिया पूर्णपणे जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या निवड समितीमार्फत राबवली जाणार आहे.


राज्यात कोतवाल सेवक पद भरतीसाठी असलेल्या 5 सप्टेंबर 2013 व 17 मे 2023 च्या जीआर मधील तरतुदीनुसार ही पदभरती केली जाणार आहे. 

विभाग व जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील (Total Vacancies)

१. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग - ६८५ पदे

  1. छत्रपती संभाजीनगर: २८३  
  2. जालना: ४७
  3. परभणी: ६४  
  4. हिंगोली: ४५  
  5. नांदेड: ७८
  6. बीड: ७१
  7. लातूर: ६२  
  8. धाराशिव: 35

२. नागपूर विभाग - ४०४ पदे

  1. नागपूर: ११५  
  2. वर्धा: ४६  
  3. भंडारा: 58
  4. गोंदिया: ३९  
  5. चंद्रपूर: ७६  
  6. गडचिरोली: ७०  

३. अमरावती विभाग - ३९८ पदे

  1. अमरावती: ८४  
  2. अकोला: ८०  
  3. वाशिम: ४१  
  4. बुलढाणा: ८५  
  5. यवतमाळ: १०८  

४. पुणे विभाग - ५२८ पदे

  1. पुणे: १४९  
  2. सातारा: ९१  
  3. सांगली: ६७  
  4. सोलापूर: ११४  
  5. कोल्हापूर: १०७  

५. नाशिक विभाग - ४२८ पदे

  1. नाशिक: १४९  
  2. धुळे: ४७  
  3. नंदुरबार: ४५  
  4. जळगाव: ८६  
  5. अहिल्यानगर : १०१  

६. कोकण विभाग - ४६९ पदे

  1. मुंबई शहर: ०  
  2. मुंबई उपनगर: १३  
  3. ठाणे: १०८  
  4. पालघर: १२३  
  5. रायगड: ११९  
  6. रत्नागिरी: ६४  
  7. सिंधुदुर्ग: ४२  

सर्व विभागांची एकूण बेरीज: २,९१२ पदे

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा 

महसूल सेवक 2026 या पदभरतीसाठी उमेदवाराचे किमान इयत्ता चौथी शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीय आरक्षित घटकासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सूट लागू होईल. 

उमेदवार स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य ज्या गावासाठी कोतवाल पदासाठी उमेदवार अर्ज करेल त्याच गावातील रहिवासी असावा यासाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला स्थानिक रहिवासी दाखला सादर करावा लागणार आहे. 

या पदभरतीसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल यामध्ये पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन गुणाचे असतील ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ सामान्य ज्ञान स्थानिक परिसर तालुका माहिती गणित मराठी भाषा या संदर्भातील प्रश्न विचारले जातील. 

कोतवाल पद भरतीसाठी कोणतेही मुलाखत घेतली जाणार नाही ही पदभरती केवळ लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार केली जाणार आहे या पदभरती दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल किंवा तो महसूल सेवकाचा वारस असेल अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं. 

या पदभरतीच्या माध्यमातून निवड होणाऱ्या महसूल सेवकाला प्रतिमाह 15000/-  रुपये एवढं मानधन दिल जाणार आहे ही महसूल विभागाअंतर्गत अवर्गीकृत महसूल सेवक म्हणून भरली जातात. 

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देखील देणे बंधनकारक आहे प्रतिज्ञा पत्राचा नमुना खालील प्रमाणे. 

#KotwalBharti2026 #MahasulSevak #MaharashtraRecruitment #GovtJobsMaharashtra #KotwalBharti #MahasulVibhag #SarkariNaukri #MaharashtraGovtSchemes

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi