राज्यात शेतीत AI प्रकल्प, पहिल्या टप्प्यात १० हजार शेतकऱ्यांची होणार निवड | AI in Agriculture
राज्यात शेतीत AI आणि डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्प राबविणार.
पहिल्या टप्प्यात सोयाबीन तूर ऊस संत्री हळद कांदा आणि मका उत्पादक १० हजार शेतकऱ्यांची होणार निवड
AI in Agriculture Maharashtra
राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI व डिजिटल ट्वीन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविणार आहे.
या संदर्भातील एक महत्त्वाची आज 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्रात AI आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावरती राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत हवामान जमिनीतील ओलावा पाण्याची गरज कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादनाचा डेटा या व मशीन लर्निंग च माध्यमातून विश्लेषण करून शेतीनिहाय व पीकनिहाय सल्ला शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील कापूस सोयाबीन तूर ऊस संत्री हळद कांदा आणि मका या पिकांसाठी दहा हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
बारामती मध्ये एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रायोगिक प्रकल्पामध्ये AI आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे सरासरी 42% पाणीबचत व ऊस उत्पादनामध्ये कमालीची सकारात्मक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
याच पार्श्वभूमी वरती राज्यात हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून राज्याला कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञानामध्ये देशात आघाडीचे राज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासह ऑनलाईन व्ही.सी.व्दारे कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव वित्त श्री. विकास चंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान श्री. सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक श्रीम. मीनल करनवाल, सकाळ समुहाचे प्रमुख श्री. प्रतापराव पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. श्री. अजित जावकर, मायक्रोसॉफ्टच्या श्रीम. सपना मोहरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रोटेक नाविन्यता केंद्राचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. पराग दाभाडे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलवडे यावेळी उपस्थित होते