वृद्ध कलाकार मानधन योजना, पहा कसा करायचा अर्ज || vrudh kalakar mandhan yojana
वृद्ध कलाकार मानधन योजना, पहा कसा करायचा अर्ज
vrudh kalakar mandhan yojana
rajarshi shahu maharaj kalakar mandhan yojana
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते.भजनी , किर्तनी, गोंधळी, आराधी , तमाशा, साहित्यिक, गायक , वादक, कवी , लेखक अशा विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकार यांना 5000 रु पर्यंत मासिक मानधन देणारी योजना राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. शासनाने याबाबत कार्यक्रम आखून दिलेला आहे. परंतु अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सन 2026 या वर्षासाठी वृध्द कलावंताचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
तरी वृध्द साहित्यिक व वृध्द कलावंतानी 31 JULY 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
योजनेचे निकष
या योजनेसाठी लाभार्थींची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. लाभार्थीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यांची वयोमर्यादा 40 वर्षे आहे. कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्षे असावे.
वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील.
ते केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसावे. कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. विधवा किंवा परितक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंतानी मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.60 हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.
अर्ज भरण्याचे निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत.
- वृध्द कलावंताचा ONLINE ARJ
- कलावंताचे कमीत कमी वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे,
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र 48 हजार पर्यत असावे,
- जन्म तारखेचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला/वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र),
- रहिवासी प्रमाणपत्र,
- किमान 15 ते 20 वर्षापासून कला साहित्य क्षेत्रात योगदान केल्याचे पुरावे,
- प्रमाणपत्र,
- इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे शपथपत्र नोटरी केलेले असावे
वृध्द साहित्यिक व कलावंत पती किंवा पत्नीचा एकत्रीत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा, अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोडची सांक्षाकित प्रत,
जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला. रोग किंवा अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकिय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत, कलासंबंधी अनुभव कागदपत्रे, आधार कार्ड, अर्जदाराचे कलाक्षेत्राबाबत परिचय पत्रात वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याची माहिती.
केंद्र, राज्य शासन पुरस्कार प्राप्त असल्यास तसेच सांस्कृतीक संचालनायाकडून पुरस्कार अथवा सन्मात पत्र सोबत जोडावे. साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार अर्जासोबत जोडावे. अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसारमाध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कात्रणे व कला सादरीकरणाचा उल्लेख असावा.
#राजर्षीशाहूमहाराजज्येष्ठसाहित्यिकवकलाकारमानधनसन्मानयोजना #महाराष्ट्र #योजना #कलाकार #साहित्यिक #आपलेसरकार rajarshi shahu maharaj kalakar mandhan yojana