VB-G RAMG Maharashtra अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता

अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता

VB-G RAMG maharashtra 1st installment 2026

राज्यात मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केंद्राच्या निधी अभावी अनुदानापासून वंचित आहेत. या विरोधात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर राज्याकडून या योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता अखेर केंद्र शासनाकडून प्रलंबित असलेला निधी वितरीत केला आहे.

आज पाच जुलै 2026 रोजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दूरदर्श प्रणाली मार्फत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यासोबत विकसित भारत आणि अजिविका मिशन ग्रामीण अर्थात  Viksit Bharat–Guarantee for Rozgar and Aajeevika Mission (Gramin) [VB-G-RAM-G] या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व सोबतच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पहिला हप्ता म्हणून 25 हजार 863 कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला. 

कोणत्याही राज्यात या योजनेअंतर्गत मजुरीचा दर हा प्रतिदिन तीनशे रुपये पेक्षा कमी नसावा याचप्रमाणे मजुरांना वेळेवरती मजुरी उपलब्ध करून देणे कामांमध्ये पारदर्शकता आणि दर्जेदार काम व्हावेत यावरती प्रत्येक राज्य शासनाने भर द्यावा अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या. 

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (विकसित भारत - जी राम जी) योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून प्राप्त प्रत्येक कुटुंबासाठी 125 दिवसापर्यंतची मजुरीकरीता 60 टक्के केंद्र निधी वितरण करणेबाबत


विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (विकसित भारत - जी राम जी) योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून प्रत्येक कुटुंबासाठी 125 दिवसापर्यंतची मजुरीकरीता प्राप्त निधीच्या अनुषंगाने समरुप 40 टक्के राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत.

हा निधी उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील थकीत असलेल्या कुशल तसेच अकुशल मजुरीच्या बिलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


GR 26.05.2026

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधीच्या अनुषंगाने समरुप राज्य हिस्सा वितरीत

GR 26.05.2026

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधी वितरीत

GR 26.05.2026

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून प्राप्त केंद्र निधी वितरण


27.02.2026 चे पत्रक 

nrega sanction order 2025 2026


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map