पोकरा योजनेचं अनुदान आल, निधी वितरित | Pocra yojna 2026
नानाजी देशमुख कृषि संजीवनी ( Pocra 2.0 yojna) प्रकल्पासाठी निधी वितरीत.
Pocra yojna 2026
Pocra yojna 2.0हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील 7201 गावांमध्ये सन २०१८ पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रू.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या 21 जिल्ह्यातील 72001 गावांमध्ये हा जागतिक अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबवला जात आहे. या टप्पा दोन अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन जुलै 2026 रोजी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. |
निधी शेतकऱ्यांना तात्काळ वर्ग करण्याचे शासन आदेश
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन 2026 साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 221 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून अशा प्रकारचा शासन निर्णय हि घेण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आर्थिक वर्ष 2026 मध्ये पुर्ण झालेल्या कामाच्या बाबींची देयके अदा करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन 2026 या अर्थसंकल्पिय तरतूदीतून रु.221.28.कोटी निधी वितरीत.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ( Pocra yojna 2022 ) वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
GR येथे पहा
👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406141517475301....pdf
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.168.1250 कोटी निधी वितरित
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.441.63 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 338.10 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.116.808 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 117 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.88.40 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 81.80 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.150 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.203.09 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.293.38 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.200 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.156.32 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2022-23 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.265.54 कोटी निधी वितरित करणेबाबत.
सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.25.77 कोटी
सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.600 कोटी निधी वितरित करणेबाबत.
या शासन निर्णयानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता ( Pocra yojna 2022 ) बाह्य हिश्श्याचा रु.४२० कोटी व राज्य हिश्श्याचा रु.१८० कोटी असा एकूण ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. हा निधी पोकरा ( हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प ) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा, असे निर्देश हि यात देण्यात आले आहेत.
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प ( Pocra yojna 2022 ) राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये एकूण रु.७३०.५३ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.६०० कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झाला आहे,
यामुळे आता गेल्या सहा महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
#NDKSP