Pik Vima Yojana 2026 राज्यात नव्या बदलासह सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना

राज्यात नव्या बदलासह सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना.

बदलत्या हवामानात, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक कवच; सुधारित GR आला.

Pik Vima Yojana 2026

सध्याचे हवामान बदल हे शेतकऱ्यांसाठी अतिशय जोखमीचे ठरत आहे कधी अवकाळी पाऊस कधी अतिवृष्टी गारपीट दुष्काळ तसेच पूर किड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशा शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी पिक विमा योजना राबवली जात आहे. 

खरीप हंगाम 2026 मध्ये देखील प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यासाठी 3 जुलै 2026 रोजी एक Pik Vima Yojana 2026 GR निर्गमित करून राज्यात Cup & Cap Model 80:110 अर्थात बीड पॅटर्ननुसार ही योजना राबवण्यात येणार आहे.

पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे फायदे 

  1. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झाल्यास त्या नुकसानीस पिक विमा योजनेअंतर्गत आर्थिक संरक्षण मिळते 
  2. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी हप्त्यात अधिक विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. 
  3. नुकसान भरपाई च वाटप प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अचूक नुकसानाचे मूल्यांकन. 
  4. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपामध्ये सहभागाची संधी.
  5. सुधारित पिक विमा योजनेनुसार महसूल मंडळामध्ये चालू वर्षातील उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे 50% याचबरोबर तांत्रिक भारांकणाच्या माध्यमातून पन्नास टक्के अशाप्रकारे मूल्यांकन केलं जाणार आहे. 

खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना बहाद्वारे बाजरी नागली, मुडीद तूर मका भुईमू तीळ कारळे सोयाबीन कापूस आणि खरीप कांदा अशा 14 पिकांसाठी पिक विमा भरता येणार आहे. 

पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून शेतकऱ्यांना स्वतः PMFBY राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल शेतकरी बँकेमार्फत किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर देखील अर्ज भरू शकणार आहे.


 अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार फार्मर आयडी जमिनीचा सातबारा आधार संलग्न बँकेचे पासबुक, स्वयंघोषित पीक पेरा प्रमाणपत्र अशी कागदपत्र आवश्यक असणार आहेत. 

या योजनेअंतर्गत केवळ कर्जदार शेतकऱ्यांनाच नव्हे तर बिगर कर्जदार शेतकरी याचप्रमाणे कुळाने किंवा भाडेपट्ट्याने जमीन करणारे शेतकरी नोंदणी प्रत भाडेपत्त्याच्या आधारे या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.

Pik Vima Yojana 2026 नवीन नियम 

खरीप हंगाम 2026 पासून ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत. 


  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऍग्री स्टॅक फार्मर आयडी तसेच डिजिटल क्रॉप सर्वे अर्थात लिपिक पाहणीमध्ये पिकाची नोंद असणं अनिवार्य करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष पेरणी झालेल्या पिकाची माहिती घेऊन चुकीच्या पद्धतीने भरल्या जाणाऱ्या पिक विमा वरती नियंत्रण ठेवलं जाणार आहे. 

  • या हंगामात शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी दहा गुंठे क्षेत्राचा विमा भरता येणार आहे त्याच्यामुळे अल्प आणि लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

  • खरीप हंगाम 2026 मध्ये ही योजना राबवली जात असताना पिक विमा योजनेमध्ये होणारी फसवणूक यासाठी कठोर तरतुदी करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये बनावट कागदपत्र चुकीची पिकाची माहिती फसव्या पद्धतीने पिक विमा योजनेचा लाभ घेतल्यास केवळ पीक विमाच नव्हे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसह कृषी विभागाच्या विविध डीबीटी योजना पासून पाच वर्षासाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे.

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जीआर आपण खालील लिंक वरती पाहू शकता. 

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम, 2026 व रब्बी हंगाम, 2026-27 करिता राज्यात राबविण्याबाबत


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map