DCC Bank Shipai Bharti 2026- DCC बँक शिपाई भरती २०२६ मोठा बदल, परीक्षा ऑफलाईन होणार!

DCC बँक शिपाई भरती २०२६ मोठा बदल, परीक्षा ऑफलाईन होणार!

१००% स्थानिकांना प्राधान्य, १२ वी पासवर नोकरी

DCC Bank Shipai Bharti 2026

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी शिपाई पदाच्या पदभरती प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदाची पद भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून या पदभरती मध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  या संदर्भातील एक महत्त्वाचा GR 6 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून यानुसार या शिपाई पदभरती साठी काही नवीन नियमावली देण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शिपाई पदाची पदभरती आता सुरक्षारक्षक वाहनचालक या पदांप्रमाणेच ऑफलाइन प्रक्रियेमधून घेण्यात येणार आहे या पदभरतीसाठी लेखी परीक्षा सत्तर गुणाची राहील तर मुलाखतीसाठी 30 मार्क असणार आहेत. 

या नवीन शासन निर्णयानुसार शिपाई पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे याचबरोबर या पदभरती मध्ये बँकेच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य देण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. 

जर हि पद भरती केली जात असताना स्थानिक उमेदवाराचे अर्ज आले नाहीत तर मात्र इतर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठीच्या सूचना देण्यात आले आहेत.

याचप्रमाणे ही पदभरतीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पाडली जात असली तरी ती पदभरतीची परीक्षा अनुभवी आणि तज्ञ एजन्सी माध्यमातूनच घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देखील या जीआर च माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.

या नव्या निर्णयामुळे या पदभरतीसाठी इच्छुक असणाऱ्या स्थानिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे याचबरोबर पदभरती ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे देखील एक मोठा दिलासा उमेदवारांना मिळणार आहे.

हा शासन निर्णय आपण खाली लिंक वरती पाहू शकता.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरतीप्रक्रीयेबाबत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map