UDID Card शासनाचा दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा या लाभार्थ्यांना मानधन मिळणार.

राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाचा मोठा दिलासा या लाभार्थ्यांना मानधन मिळणार. 

UDID Card 

राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. याचप्रमाणे टेम्पररी वैश्विक ओळखपत्र ( Temporary Udid card) असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ बंद करण्यात आलेला होता.


मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील तात्पुरते #दिव्यांगत्व प्रमाणपत्र (यूआयडी कार्ड) धारक लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधता कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे. 

या निर्णयामुळे राज्यातील हजारो तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ सातत्याने उपलब्ध राहणार असून, त्यांच्या पेन्शन व अर्थसहाय्य वितरणामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

GR LINK PDF

तात्पुरते दिव्यांगत्व (Temporary UDID) प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरु

#दिव्यांग_कल्याण #संजयगांधी_योजना #DivyangEmpowerment #UDIDCard

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026