घरकुल जागा खरेदीला ₹१ लाखाचे अनुदान | pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana

घरकुल जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य

pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana

pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana

देशभरातील बेघर कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच राज्यातील रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिमावास योजना इत्यादी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून दिली जात आहेत. 

मात्र या योजनेअंतर्गत पात्र असलेले काही लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध असताना सुद्धा केवळ जाग्या अभावी घरकुलाचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. याच बाबीचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना आणण्यात आलेली आहे. 

या योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपये पर्यंत अर्थसहाय उपलब्ध करून दिले जात आहे जागेची किंमत एक लाखापेक्षा जास्त असेल तर वरील किंमत ही लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. 

या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक शुल्क रूपे हजार आकारणे याचप्रमाणे मोजणी शुल्का मध्ये 50% सवलत लागू करणे अशा प्रकारच्या सवलती देखील लागू करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला घरकुलासाठी 500 चौरस फुटापर्यंत च जागा खरेदी करता येते.

योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचे अनुदान अनुदेय असून लाभार्थ्यांना जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य जागेची किंमत या सर्वांची शहानिशा करून या जागेची किंमत निश्चित केली जाते. 

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड (अर्जदार आणि कुटुंबातील सदस्यांचे)
  • रेशन कार्ड (शिधापत्रिका)
  • रहिवासी दाखला (ग्रामपंचायतीचा)
  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्याकडील)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • घरकुल मंजूर झाल्याचा पुरावा (घरकुल प्रतीक्षा यादीतील नाव किंवा मंजुरीचे पत्र)
  • भूमिहीन असल्याचा दाखला (तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून दिलेला)
  • जागा मालकाचे संमतीपत्र (ज्यांच्याकडून जागा खरेदी करायची आहे, त्यांचे नोटरी केलेले संमतीपत्र/करारनामा)

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्ज | pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana Arj Namuna

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map