Mahila Shetkari महिला शेतकऱ्यांसाठी शासनाचं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक; मंत्रिमंडळाची मंजुरी

महिला शेतकऱ्यांसाठी शासनाचं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक; मंत्रिमंडळाची मंजुरी

आता महिला शेतकरी होणार मालक, मिळणार शेतकरी दाखला 

Mahila Shetkari kayda 2026

मात्र महिलांच्या नावावरती जमिनीचा सातबारा नसल्यामुळे अनेकदा महिलांना शेतकरी म्हणून दर्जा मिळत नाही महिलांना पीक कर्ज असतील विमा असेल किंवा इतर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा शासनाच्या माध्यमातून दिला जात नाही. 

महिलांची ओळख ही केवळ शेतमजूर किंवा शेतकऱ्याची मदतनीस अशीच आहे आणि हीच ओळख पुसून महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे विधेयक आणला जात आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहे. 

या महिलांसाठी आणल्या जाणाऱ्या नवीन विधेयका नुसार जमिनीची मालकी नावावर नसली तरी शेतात राबणाऱ्या महिलांना आता थेट कायदेशीर महिला शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे नागरी स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना आता महिला शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल. 

याचबरोबर शेती करणाऱ्याच नव्हे तर दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुकुटपालन, पशुपालन, मधुमक्षिका पालन, याचप्रमाणे वनउप संकलन करणाऱ्या ज्या महिला असतील तसेच भूमीन शेतमजूर महिला भाड्याने शेती करणाऱ्या महिला असतील अशा सर्व महिलांना देखील एक शेतकरी म्हणून दर्जा दिला जाणार आहे.

या विधेयका नुसार राज्यात महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाकरता आर्थिक सहाय्य कृषी अनुदान पीक कर्ज इत्यादी सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष निधीची देखील तरतूद केली जाणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या विधेयकाच्या आणण्यात आलेल्या मसुद्याला मान्यता दिलेली आहे आणि सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडले जाऊन या विधेयकावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे याच्या संदर्भातील अधिकृत जीआर निघेल आणि त्याबाबतची पुढील माहिती दिली जाईल.


#MahilaShetkari #MaharashtraShetkari #ShetiYojana #MahaDBT #ShetkariPramanpatra #GRUpdate #PrabhudevaGR

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map