अवकाळी पावसाने २७ जिल्ह्यातील हजारो हेक्टर बाधित; पंचनामे करण्याचे आदेश || Avkali Nuksan 2026

गारपीट अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश.

Avkali Nuksan 2026

राज्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मे व जून या दोन्ही महिन्यांमध्ये राज्यातील 27 जिल्ह्यामधील 61 हजार चारशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असून यापैकी 18 हजार 121 हेक्टर हे क्षेत्र केळी पिकाखालील आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव बुलढाणा सोलापूर पुणे अकोला अमरावती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे एकंदरीत 27 जिल्ह्यामधील 61 हजार 400 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा प्राथमिक अहवाल वर्तवण्यात आलेला आहे. 

झालेल्या नुकसानी पैकी मे आणि जून महिन्यात झालेल्या नुकसानीमध्ये जळगाव जिल्ह्यात ७५९४ हेक्टर बाधित झालेल्या असून त्यापैकी 7216 हेक्टर क्षेत्र केळी फिका खालील आहे.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना कृषिमंत्री यांनी आज दिल्या.

बऱ्याच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. 

आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार शुक्रवारी काही ठिकाणी वादळी वारे व गारपीट झाली. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी फळबागांचे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map