कृषी विभागाच्या पुरस्काराचे 1 जुलैला वितरण || Krishi Awards Maharashtra

कृषी विभागाच्या पुरस्कारांचे 1 जुलैला वितरण.

Krishi Awards Maharashtra 

राज्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण आणि उद्यान पंडित यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे.

सन २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.जिष्णु देव वर्मा यांना प्रमुख उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.



महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, नाविन्यपुर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि.१ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे हा गौरवशाली सोहळा संपन्न होणार आहे.

या पुरस्कारासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 1जुलै रोजी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदींचा समावेश आहे.

सन 2023 मधील पुरस्कारासाठी पात्र शेतकरी 

सन 2024 साठी पुरस्कारासाठी पात्र शेतकरी 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

3.55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi