Kharip Pikvima नांदेड जिल्ह्याला ₹८१४ कोटींचा पीकविमा मंजूर

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर.

रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

Kharip Pikvima 2025

खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 814 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात खरीप 2025 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनाअंतर्गत ४,३४,८१९ शेतकऱ्यांनी ८,२९,७३७ विमा अर्ज दाखल केले असून ५,१३,९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता.  राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. 

सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी रु.८१३.९३ कोटी रक्कम मंजूर झाली असून पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. या आधारे आलेल्या आकडेवारीनुसार नांदेड जिल्ह्याला  उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त रु.८१३.९३ कोटी रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर रु.८१३.९३ कोटी रकमेचे वितरण सुरु आहे.

असा पहा आपला पीकविमा मंजूर आहे का?



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map