रॉकेल वितरकांसाठी तातडीची सूचना! परवाना नूतनीकरण करा अन्यथा स्टॉक मिळणार नाही | Kerosene License Renewal 2026

रॉकेल वितरकांसाठी तातडीची सूचना! 🚨 परवाना नूतनीकरण करा अन्यथा स्टॉक मिळणार नाही 

Kerosene License Renewal 2026

केरोसीन परवाना नूतनीकरणासाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन

सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून केंद्र शासनाने दि. 12 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यास 3744 कि.ली. रॉकेल वाटपासाठी मंजुरी दिली आहे.

या अनुषंगाने राज्यात रॉकेल वाटपासाठी तयारी करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


या वितरणासाठी सर्व किरकोळ, होलसेलर व सेमी होलसेलर परवाना धारकांनी आपल्याकडे असणारा संबंधित परवाना नूतनीकरणासाठी तात्काळ तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे. याचबरोबर केरोसीन वाटप करण्यास इच्छुक नसल्यास तसे लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जर एखाद्या केरोसिन वितरक मूळ परवानाधारक मयत असल्यास, वारसाहक्काने परवाना वर्ग करता येतो, असे कोणी इच्छुक असल्यास त्यांनी तत्काळ प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.


केरोसिन वितरणाची प्रक्रिया ही कालमर्यादित असल्यामुळे उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा परवाना नूतनीकरण तसेच वारस प्रक्रियेबाबत कोणताही विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर आपली प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या केरोसिन वितरणासाठी केरोसिन वितरकांना प्रति लिटर १ रुपया ३५ पैसे एवढे कमिशन दिले जाणार आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map