Gairan Jamin गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे आदेश 

Gairan Jamin 2026

राज्यातील 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमण नियमाकूल करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच अंतर्गत गायरान जमिनीवरील सन 2011 पर्यंतचे मराठवाड्यामधील निवासी अतिक्रमणा नियमाकूल करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली.

मराठवाड्याचे नवीन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याचप्रमाणे अप्पर आयुक्त रीता मेत्रेवार, अप्पर आयुक्त सुषमा देसाई, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंत ची निवासी अतिक्रमाने नियमित करण्याबाबत 25 मार्च 2026 च्या राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे.

याच बैठकीमध्ये गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया या 15 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशा प्रकारचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

कोणत्याही परिस्थितीमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी याच प्रमाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वराज्य संस्थांना 15 मे 2026 पर्यंत जमीन हस्तांतरित करावी सदरील 100% प्रक्रिया कोणतेही परिस्थितीमध्ये 15 मे 2026 पर्यंत पूर्ण करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.


या कामकाजाचा विभागीय पातळीवरून दैनंदिन आढावा घेण्यात यावा या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब होऊ नये अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांनी या बैठकीच्या वेळी देण्यात आले आहेत.

शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणा नियमित करण्याची प्रक्रिया पारदर्शक जलद आणि नियमानुसार पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावं तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिबिरांचा देखील आयोजन करावं अशा प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत.

मराठवाड्यामध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेला गती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना या प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map