एसटीच्या ताफ्यात आता राजमाता जिजाऊ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण | RajMata Jijau Bus

एसटीच्या ताफ्यात आता राजमाता जिजाऊ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

RajMata Jijau Bus MSRTC

RajMata Jijau Bus

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एसटीच्या ताफ्यात नव्या बसचा समावेश केला आहे. या नवीन बसला राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आले आहे. 

'राजमाता जिजाऊ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २४ मार्च रोजी केले जाणार आहे.राजमाता जिजाऊ बसच्या लोकार्पण सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात  तब्बल ३ हजार या नवीन स्मार्ट बस समाविष्ट केल्या जाणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

या नव्या स्मार्ट बसेसना 'राजमाता जिजाऊ' हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राजमाता जिजाई या नव्या स्मार्ट बसची वैशिष्ट्ये

या स्मार्ट बसेसमध्ये ३X २ असं व्यवस्था असून एकूण ५६ आसन क्षमता आहे, सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. 

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या स्मार्ट बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map