सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता दस्त नोंदणी कार्यालय सुरू || Property sale purchase Registration
सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार मालमत्ता दस्त नोंदणी कार्यालय
Property sale and purchase registration
२०२५-२६ आर्थिक वर्ष संपत आल्याने राज्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात मोठी वाढ दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी विक्री नोंदणी करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
26 मार्च, 28 मार्च, 29 व 31 मार्च या दिवशी सह जिल्हा निबंधक यांच्या अधिपत्याखालील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय नियमित सुरू राहतील.
वर्ष अखेरीला कार्यालयात होणारी गर्दी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार सुट्या आहेत. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने व्यवहारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार व दस्त नोंदणी होणार आहे.
आर्थिक वर्ष संपत असल्याने आणि मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नोंदणी महानिरीक्षकांनी तसे पत्र दिले आहे.
याशिवाय शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुटी इतर दिवशी आहे, त्यांनी त्या सुट्यांच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवावे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी सर्व कार्यालय पूर्णवेळ सुरू राहतील.