काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना? अटी, कागदपत्र, लाभ || PM matru vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहेत लाभ, अटी शर्ती पात्रता कागदपत्र पहा सविस्तर

PM matru vandana Yojana PMMVY

PM matru vandana Yojana 2026

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक केंद्र शासन पुरस्‍कृत अत्‍यांतिक महत्‍वाकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे गरोदर मातांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये DBT ने राज्‍यस्‍तरावरुन अनुदान वर्ग केले जाते. 

या योजनेत बदल करून नवीन बदलासह ही योजना १४ जुलै २०२२ च्‍या केंद्र शासनाच्‍या पत्रानुसार देशाभरात लागू करण्‍यात आली आहे. 

पुर्वी केवळ पहिल्‍या गरोदरपणाच्‍या वेळी लाभ देणारी योजना आता बदल करून करुन १ एप्रिल २०२२ नंतर दुसरे अपत्य मुलगी असेल तरी लाभ मिळणार आहे. प्रधान मंञी मातृ वंदना योजनेतंर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना पहिल्‍या अपत्‍यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्‍त) ची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांमध्‍ये पहिला₹३००० व दुसरा हप्ता ₹२००० असा लाभ मिळणार आहे.

याचबरोबर या योजनेत आता  दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास मुलीच्‍या जन्‍मानंतर एकाच टप्‍प्‍यात रु. ६०००/- (अक्षरी रु. सहा हजार फक्‍त) चा लाभ आधार संलग्‍न बॅक खात्‍यात किंवा पोस्‍ट ऑफिस मधील खात्‍यात (डीबीटी) व्‍दारे मिळणार आहे.


प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभार्थी पात्रता 

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिला.
  • अनुसूचित जाती जमातीच्या महिला लाभार्थी.
  • दिव्यांग, दारिद्रय रेषेखालील रेशन कार्ड असलेल्या महिला.
  • ई श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, pm KISAN लाभार्थी महिला.
  • अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दिला जाणारा लाभ

1) पहिल्या अपत्यासाठी ५००० 

राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदर पणाची नोंदणी आवश्यक.

बालकास पेंटा ३ पर्यंतचे लसीकरण आवश्यक.

2) दुसऱ्या अपत्यासाठी - मुलगी असेल तर जन्म दाखला व पेंटा ३ पर्यंतचे लसीकरण आवश्यक.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक कागदपत्र 

  1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  1. लाभार्थी महिलेचे गरोदर नोंदणी कार्ड, मुलीचे लसीकरण कार्ड.
  1. DBT साठी आधार लिंक बँक खात्याचे पासबुक प्रत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज कुठे करायचा.

या योजनेच्या लाभासाठी अर्ज आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करावा.या योजनेचा अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने घेतला जातो.

आपल्या गावातील आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचे २०२२ मध्ये शुभारंभ करण्यात आला आहे.


#PMMVY

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map