Recent Post

Popular Posts

मोठा दिलासा अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मंजूर | Pashu Nuksan bharpai

मोठा दिलासा अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मंजूर; शासनाचे मोठे बदल.

Pashu Nuksan bharpai



जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती मुळे मृत पावलेली जनावर, गायब झालेली जनावर या पशुधनाची नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे. हि नुकसान भरपाई मंजूर केली जात असताना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी असलेल्या किचकड अटी शर्ती निकषात बदल करण्यात आले आहेत. 

नुकसान भरपाई वितरणासाठी असेलेली पशुधन मर्यादा, जमीन मर्यादा या सर्व अटी हटविण्यात आल्या आहेत. या स्नदर्भातील शासन निर्णय २७ मार्च २०२६ रोजी घेण्यात आला आहे. 

शासन निर्णय येथे पहा GR Link PDF 

राज्यात जून ते सप्टेबर २०२5 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief package) व सवलती  मार्गदर्शक सूचना.

Pashu Nuksan bharpai

शिथिल करण्यात आलेले निकष:-

  1. अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील.
  2. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
  3. प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
  4. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
  5. प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी रु. १०,०००/- च्या मर्यादेत याऐवजी मृत/बेपत्ता राहतील सर्व कुक्कुट मदतीसाठी पात्र राहतील.

मृत/बेपत्ता पशुधनाची खातरजमा

अतिवृष्टीत/पुरात मृत पावलेल्या/वाहून गेलेल्या पशुधनाची किमान खालीलपैकी एका ठिकाणी नोंद असणे आवश्यक राहील.

  1. राष्ट्रीय डिजीटल पशुधन अभियानांतर्गत (NDLM) भारत पशुधन अॅपवर नोंदणी 
  2. २१ वी पशुगणनेतील नोंद.
  3. पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियतकालीक लसीकरणाची नोंदवहीतील नोंद / ऑनलाईन नोंदी.
  4. विमा कंपनीकडील नोंद.
  5. शदुध अनुदान योजनेत समाविष्ट असलेले पशुधन व त्यांचे मालक याची नोंद.

पंचनामा:-

मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल मदतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, नोंदणीकृत असलेल्या जनावरे मृत झाल्यामुळे अथवा पशुधन वाहून गेले असल्यामुळे त्याचा शोध / तपास लागत नाही, अशा पशुधनाच्याबाबतीत संबंधित पशुपालकास मदत मिळण्यासाठी खालील अधिकाऱ्यांच्य उपस्थितीत पंचनामा करण्यात यावा.

  1. स्थानिक पशुधन विकास अधिकारी
  2. तलाठी
  3. पोलीस पाटील / सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक
  4. संबंधित पशुधनाचे मालक

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनाः

मृत अथवा बेपत्ता असलेल्या विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अनुज्ञेय असल्यास संबंधित पशुपालक मदतीसाठी पात्र राहणार नाही, मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची राहील. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाचे आधार संलग्नित बँकखात्याचा तपशील पंचनामा / शवविच्छेदन अहवालासह तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या मर्यादेत देण्यात येणारे अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करुन देण्यात येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागविण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील.