राज्यात धान खरेदीसाठी नोंदणी सुरू || Paddy Procurement Maharashtra 2026

राज्यात धान खरेदीसाठी नोंदणी सुरू; शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन 

Paddy Procurement Maharashtra 2026

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान खरेदी करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांना धान हमीभाव नोंदणी करण्याची मुदत दि.०१ एप्रिल २०२६ ते दि.३० एप्रिल २०२६ आहे.

शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. या कालावधीत ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची दि.०१ मे २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत धान व भरडधान्य खरेदी केली जाणार आहे.

धान उत्पादकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणी केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.

धानाच्या हमीभाव खरेदी नोंदणी करत असताना कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांना चालू हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना ८ अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्र लागतील.

शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पणन महासंघाच्या "अ" वर्ग व "ब" वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे.

#धानखरेदी #MSP #BeAMPortal #शेतकरी #कृषीविभाग 




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map