Grape Farming Subsidy द्राक्ष लागवडीचा मनरेगा योजनेत बैठक घेऊन समावेश करणार

द्राक्ष शेतीला मनरेगा योजनेत समावेश करण्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीवर बैठक घेऊन निर्णय घेणार मंत्री भरत गोगावले

Grape Farming Subsidy 

राज्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी द्राक्ष शेतीला मनरेगा अनुदान योजनेत समावेश करावा अशी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. याचबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या चर्चे दरम्यान विधानसभेत आमदार रोहित पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावर उत्तर देत असताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व विभागाच्या संमतीने व विचाराने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

बेकायदा बेदाणा आयात रोखण्यासाठी सीमा शुल्क यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. कमी दर्जाच्या बेदाणाची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीआयकडून ही तपासणी होते का ते पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल. द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी सर्व संबंधित विभाग आणि मुख्यमंत्री यांच्या संमतीने आणि विचार विनिमयानंतर घेण्यात येईल. 

स्थानिक बेदाण्याला सध्या चांगला दर मिळत असला तरी, अफगाणिस्तानसारख्या देशांतून बेकायदेशीर मार्गाने येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यामुळे बाजारपेठेवर दबाव येत आहे. 

तासगाव (सांगली) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये असा आयात केलेला माल स्थानिक नावाने विकण्याचे प्रकार समोर आले असून, संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत बाजार समिती मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे - रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map